Prajakta Mali : मंत्रिमंडळाचे खातेवाटप पार पडले. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक खाते आले आहे. सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच त्यांनी एक घोषणा केली आहे.
राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी “हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील,” अशी घोषणा केली.
या निर्णयाला अनेकांनी सहमती दर्शवली दिला तर अनेकांनी याचा विरोधही केला आहे. दरम्यान, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने सुधीर मुनगंटीवार यांच्या या घोषणेला पाठिंबा दिला असल्याचे दिसून येत आहे.
प्राजक्ता माळीने तिच्या इंस्ट्राग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आपल्या घराच्या खिडकीमध्ये तिरंगा फडकावला आहे. याचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव…. स्वातंत्र्यदिन चिरायू होवो…. माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता, परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो. ह्या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं. ह्या कामी सर्व देशवासीयांनी झटावं.” असे तिने लिहिले आहे.
पुढे, “आणि हो आजपासून फोनवर हॅलो बंद वंदेमातरम् सुरु. देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती. ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना.” असेही प्राजक्ताने लिहिले आहे. यासोबतच अटल बिहारी वाजपेयी यांची एक कवितासुद्धा तिने शेअर केली आहे.
प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या चर्चेत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ही पोस्ट शेअर करत तिने आपले देशप्रेम व्यक्त केले आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेला पाठींबा दर्शविला आहे.
महत्वाच्या बातम्या
Palghar : एकीकडे स्वातंत्र्यदिन साजरा करत होता देश तर दुसरीकडे जुळ्या बालकांचा झाला मृत्यु
Kaushik lm : चित्रपटसृष्टीवर शोककळा! विजय देवरकोंडा, धनुष, सलमानने जवळचा मित्र गमावला
Movies: तो चित्रपट ज्याने बंगाल दंगलींची करून दिली होती आठवण, पण ‘या’ कारणामुळे झाला बॅन
Nitish Kumar: अमित शहांचा ‘तो’ शेवटचा फोन आणि नितीश कुमारांची अट, नंतर ९ दिवसात झाला राजकीय भूकंप