प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच ‘वाय’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीची महत्वाची भूमिका आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीची(Prajkta Mali) प्रमुख भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती.(Prajakta did not get tired even after doing 108 soryanamskaar Said while sharing the video)
या वेबसिरीजमधील तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले होते. अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक आहे. ती नेहमीच तिचे व्यायाम करत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळीने सूर्यनमस्कार करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी १०८ सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओला लाइक केलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने न थकता तब्बल १०८ सूर्यनमस्कार केल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने आज मी १०८ सूर्यनमस्कार केले. तसा योग दिन २१ ला असतो. कदाचित २१ ला परत करेन. तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर … काय म्हणता, करणार का? जमेल तितके करा…”, असे अभिनेत्री प्राजक्ता माळीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
माझ्यावर योगा आणि प्राणायामचा खूप प्रभाव आहे, असे अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत सांगितले होते. रानबाजार’ या मराठी वेबसिरीजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीला एक सीनमध्ये सिगारेट ओढावी लागली होती. एका मुलाखतीत याबद्दल बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली की, “मी धूम्रपानाच्या विरोधात आहे. मी यापूर्वी कधीच धूम्रपान केलेलं नाही. भूमिकेची गरज म्हणून मला या वेबसिरिजमध्ये सिगारेट ओढावी लागली.”
“मी दारूचंही कधीच व्यसन केलेलं नाही. मला दारूचं किंवा सिगारेटचं व्यसन कधीच लागू नये, अशी मी नेहमी देवाकडे प्रार्थना करत असते. कारण व्यसनाचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो. माझ्यावर योगा आणि प्राणायामचा खूप प्रभाव आहे. त्यामुळे मी व्यसनांपासून लांब आहे”, असे अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुलाखतीत सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या :-
मला अनेकदा टिममधून बाहेर काढलं पण.., दमदार खेळीनंतर दिनेश कार्तिकने व्यक्त केलं दु:ख
बहिणीप्रमाणे त्याला करायची होती देशसेवा, पण पोलिसांच्या गोळीबारात झाला मृत्यू; जाणून घ्या राकेशची कहाणी
ईशान किशनने दिलेल्या ‘त्या’ माहितीचा आवेश खानला झाला फायदा, मिळाले ४ विकेट्स, वाचून अवाक व्हाल