राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडणार असे भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार म्हटले जात आहे. तसेच राष्ट्रवादी सुद्धा सावध असून त्यासाठी ते बैठका सुद्धा घेत आहे. असे असतानाच आता गोंदियामध्ये मात्र एक वेगळंच चित्रा पाहायाला मिळालं आहे.
राष्ट्रावादी काँग्रेसमधील महत्वाचे नेते प्रफुल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर दिसून आले आहे. या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात बोलत असताना राजकीय फटकेबाजी सुद्धा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांचीच चर्चा होत आहे.
तुमच्यातील अनेकजण विचार करत असतील की देवेंद्र जी इकडे कसे आले? राजकारणात अंदर-बाहरच्या अनेक गोष्टी चालत असतात. आमच्यात आणि त्यांच्यात खुप बोलणंही होतं. विशेष म्हणजे गुप्त बोलणंही होतं. अनेकांना याचा त्रासही होईल, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.
तसेच यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, प्रफुल भाईंनी मला निमंत्रित केलं याबद्दल मला आनंद आहे. मी इकडे आलो, तुम्ही इकडे आहात. त्यामुळे चर्चा तर होणारच. बात निकली है तो दूर तक भी जाएगी. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना आणखीनच उधाण आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण महर्षी समजल्या जाणाऱ्या प्रफुल पटेलांचे वडील मनोहर भाई पटेल यांची ११७ वी जयंती होती. त्यानिमित्ताने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. त्याच कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण यावेळी दोन्ही नेत्यांनी जी वक्तव्ये केली त्यामुळे ते चर्चेच आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे ४० आमदार आपल्यासोबत नेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले होते. त्यानंतर राजकारणात आणखी एक भूकंप होणार असे भाजप नेत्यांकडून म्हटले जात आहे. त्यामुळे आता भाजपच्या निशाण्यावर राष्ट्रवादी आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पुन्हा पडणार फुट? नव्या गटनेत्याच्या नावामुळे चर्चांना उधाण
मविआत पुन्हा उभी फूट! १५ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश; कोण आहेत हे १५ आमदार?
मस्क, अंबानींनी मागे टाकत फोर्ब्सच्या ‘या’ यादीत अदानी ठरले टॉपर; फेरारीच्या वेगाने वाढली संपत्ती