कोरोनामुळे मृत्यु झाला तर नातेवाईकांना या सरकारी योजनेतून मिळतील २ लाख; असा करा अर्ज

देशभरात कोरोना संकटाने धुमाकूळ घातला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे रोज लाखोंच्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहे. तर रोज हजारो रुग्णांचा मृत्यु होत आहे, त्यामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे.

अशात जर तुमच्या ओळखीतील कोणाचा कोरोनामुळे मृत्यु झाला असेल, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य २ लाख रुपयासाठी सरकारकडे क्लेम करु शकतात. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेतून कुटुंबातील लोकांना हा क्लेम करता येणार आहे. हा एक टर्म इन्शुरन्स असून त्याला दरवर्षी रिन्यु करावं लागतं.

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर जर एखाद्या कुटुंबातील वक्तीचा मृत्यु झाला. तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना २ लाख रुपये मिळतात. देशातील प्रत्येक नागरीकाला या जीवन विम्याचा लाभ मिळावा या उद्देशाने ही योजना मोदी सरकारने सुरु केली होती. या प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनाची सुरुवात ९ मे २०१५ ला मोदी सरकारने केली होती.

या योजनेच्या माध्यमातून १८ ते ५० वयोगटातील व्यक्तीला इन्शुरन्स कव्हर मिळते. यासाठी वर्षाकाठी ३३० रुपयांचे प्रिमियन बरावे लागते. विशेष म्हणजे हा विमा कोणत्याही बँकेत खाते असलेला विमादार भरु शकतो.

या योजनेअंतर्गत विमा काढलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यु झाल्यास त्याला इन्शुरन्स कव्र मिळते. हे कव्ह कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्या लोकांसाठी लागू आहे. हत्या झाली तरीही हा विमा लागू होऊ शकतो.

प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना ही वार्षिक टर्म पॉलिसी आहे. यामध्ये इन्शुरन्स कव्हरसाठी १ जून ते ३१ मे असे वर्ष ग्राह्य धरले जाते. ज्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला असेल, त्यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात इन्शुरन्स पॉलिसीचे प्रिमिअम भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याचे कुटुंब इन्शुरन् क्लेम करु शकत नाही.

या योजनेच्या नियमांनुसार विमा धारकाचा मृत्यु झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत नॉमिनी अर्थात विम्याच्या वारसदाराला विमा क्लेम करावा लागतो. हा क्लेम मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म, मृत्यु प्रमाणपत्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे आणि एक कॅन्सल चेक ही सर्व कागद पत्र द्यावी लागतात. मृत्यु प्रमाणपत्राला जास्त कालावधी लागत असेल, तर नॉमिनीला बँकेच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या-

बर्थडेच्या दिवशीच २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू; मारेकरी म्हणतो सेक्स करताना गुदमरल्यामुळे मृत्यू झाला
मी अक्षयकुमारसारखी पैशांसाठी पगडी घालत नाही; पंजाबच्या स्टार क्रिकेटरचा अक्षयला टोला
दयाबेनला पागल औरत म्हटल्यावर जेठालाल अडकले वादाच्या भोवऱ्यात, वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.