Share

रात्री 12 वाजता रस्त्यावरून धावताना दिसला तरुण; लिफ्टही नाकारली, कारण वाचून पाणावतील डोळे

नोएडाच्या रस्त्यावरन एक १९ वर्षांचा मुलगा रात्री १२ वाजता धावत होता. या मुलाचा चेहरा घामाने पूर्ण भिजला होता. या मुलाला दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी रस्त्याने धावताना पहिले. त्यांनी त्या मुलाला कारने घरी सोडण्याची देखील ऑफर दिली. पण अनेक विनंती करून देखील त्या मुलाने ती ऑफर नाकारली.(pradeep boy runing on road daily viral video)

या मुलाचा धावतानाचा व्हिडिओ निर्माते विनोद कापरी(Vinod Kapri) यांनी मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मुलाचे खूप कौतुक होत आहे. हा मुलगा सध्या ट्विटरवर ट्रेंड होतं आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि अष्टपैलू खेळाडू केविन पीटरसनने देखील या मुलाचे कौतुक केलं आहे.

१९ वर्षीय प्रदीप मेहरा नावाचा मुलगा रात्री १२ वाजता नोएडा शहरातील रस्त्यावरून धावत होता. तो धावत रात्र कामावरून घरी निघाला होता. प्रदीप मेहरा मॅकडोनाल्डमध्ये नोकरी करतो. तो दररोज १० किलोमीटर धावत त्याच्या घरी जातो. कारण त्याला भारतीय सैन्यात भरती व्हायचे आहे. प्रदीप हा उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

https://twitter.com/vinodkapri/status/1505535421589377025?s=20&t=kbUgvWpHEj5p6a_k7QeQOQ

त्याने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, “तो नोएडामध्ये त्याच्या मोठ्या भावासोबत राहतो. त्याची आई सध्या रुग्णालयात दाखल आहे.” कंपनीत काम केल्यानंतर तो दररोज घरी धावत जातो. कारण त्याच्याकडे धावण्याच्या सरावासाठी जास्त वेळ नसतो. तो दररोज रात्री घरी परतल्यानंतर जेवण बनवतो.

या व्हिडिओमध्ये चित्रपट दिग्दर्शक विनोद कापरी त्या मुलाला विचारतो की, “तुझा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. यावर तो मुलगा हसतो आणि म्हणतो, मला कोण ओळखेल, पण जर ते व्हायरल झाले तर ठीक आहे, मी काही चुकीचे करत नाही.” यावेळी चित्रपट दिग्दर्शक विनोद कापरी यांनी त्या मुलाला एकत्र बसून जेवणाची ऑफरही दिली.

पण त्या मुलाने ती ऑफर देखील नाकारली. ऑफर नाकारताना तो म्हणाला की, “जर मी तुमच्यासोबत जेवायला गेलो, तर माझा भाऊ उपाशी राहील. माझा भाऊ एका कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतो आणि स्वत:साठी तो स्वयंपाक करू शकत नाही.” यावर विनोद कापरीने त्या मुलाचे कौतुक केले. या व्हिडिओला लाखो लोकांनी पहिले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
१०० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले, तरी ब्लेडचे डिझाइन आजही तसेच का आहे माहितीये का?
तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत वाद, मुनगंटीवार आणि अजितदादा भिडले
लहान मुलांच्या झोक्यावर खेळण्याची मस्ती तरुणांना पडली महागात; व्हिडिओ पाहाल तर हसून-हसून लोटपोट व्हाल

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now