तुटलेले स्टिक्स घेऊन केला सराव, वडिलांची ८० रुपये कमाई, राणी रामपालने दाखवले ऑलम्पिक पदकाचे स्वप्न

टोकियो । सध्या टोकियोमध्ये ऑलम्पिक स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये भारतीय खेळाडू देखील आपल्या खेळाचे प्रदर्शन करत आहेत. यामध्ये भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना टोकियो ऑलम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे या खेळाडूचे कौतुक होत आहे.

तीन वेळा ऑलम्पिक पदक विजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून हा विजय भारताने मिळवला आहे. भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्डे मारिन्ज आणि कर्णधार राणी रामपाल यांचा मोठा वाटा आहे. यामुळे त्यांचे देखील कौतुक होत आहे.

मला माझ्या आयुष्यातून सुटका हवी होती, घरात वीज नव्हती, झोपल्यानंतर कानाजवळ भुणभुण करणारे डास, दोन वेळच्या जेवणाची अबाळ, पावसात घराचे तलाव बनायचे. अशात राणी रामपाल लहानाची मोठी झाली. कुटुंबीयांनी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. तिचे वडिल कार्ट पुलर होते, आणि आई घरकाम करायची.

तिच्या घराजवळ हॉकी अकादमी होती. तेव्हा ती सराव करणाऱ्या खेळाडूंकडे बघत बसायची, मलाही तेव्हा खेळावे असे वाटायचे, परंतु पप्पा दिवसाला ८० रुपये कमवायचे. त्यांना हॉकी स्टीक्स घेणे परवडणारे नव्हते. प्रशिक्षकांकडे विनंती केली, मात्र त्यांनी देखील नकार दिला.

मी कुपोषित वाटत होते आणि तुझ्या तेवढी ताकद नाही असे त्यांनी मला सांगितले. एकदा तिला तुटलेली हॉकी स्टीक्स मिळाली आणि तिने सरावाला सुरुवात केली. तिच्याकडे कपडेही नव्हते. अनेक प्रयत्न केल्यानंतर प्रशिक्षकांनीही तिला ट्रेनिंग देण्यास होकार दिला. मात्र घरच्यांनी विरोध केला.

पण तिने सांगितले मी यामध्ये यशस्वी नाही झाले तर तुम्ही म्हणाल तसे करेल. अकादमीत प्रत्येक खेळाडूला अर्धा लिटर दूध आणणे कम्पलसरी होते. ते तिला शक्य नसल्याने ती थोड्याच दुधात पाणी मिसळत होती. तिची तळमळ पाहून प्रशिक्षकांनीही तिच्यासाठी नवी हॉकी स्टीक्स व शूज खरेदी केले होते.

आपले स्वताचे घर असेल, असे वचन तिने घरच्यांना दिले होते. यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर ती हॉकी संघाची कर्णधार बनली. २०१७ मध्ये तिने घराचे स्वप्न पूर्ण केले. तिची पहिली कमाई ५०० रुपये होती. तेव्हा तिने ते पैसे वडिलांना दिले होते, तेव्हा तिच्या वडिलांनी पहिल्यांदाच एवढे पैसे बघितले होते.

ताज्या बातम्या

इंडिअन आयडल १२: पवनदीप, अरुणीता, षण्मुखप्रिया यांना मिळाले २० गाण्यांचे कॉन्ट्रेक्ट; ट्रॉफी जिंकण्याआधीच लागली लॉट्री..

कोरोना नियमात मोठे बदल, राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर, ‘या’ जिल्ह्यांत लॉकडाऊन उठवले…

..तेव्हा संजय राऊत ततपप करत बाथरूममध्ये लपले होते; राणेंनी केला गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.