प्रभुदेवा करणार भाचीसोबत लग्न.? रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा

मुंबई । दाक्षिणात्य कलाविश्वातील मोठे नाव, अभिनेता, दिग्दर्शक प्रभुदेवा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.प्रभुदेवा पुन्हा एकदा प्रेमात असल्याचे चर्चा आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

येत्या काळात तो या प्रेमाच्या नात्याला एक नवे नाव देत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेणार असल्याचेही म्हटले जात आहे. प्रभुदेवा हा त्याच्या भाचीसोबतच रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. नव्याने प्रेमाच्या नात्याची अनुभूती घेणारा हा सेलिब्रिटी नात्याला पुढच्या टप्प्यावर नेत तिच्याशी लग्न करणार असल्याची माहीती मिळत आहे.

याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्येही प्रभुदेवाची नवी इनिंग नेमकी कशी असेल याबाबतची कमालीची उत्सुकता लागली आहे. याबाबत त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर विचारणा केली जात आहे.

प्रभुदेवाचे या अगोदर लग्न झाले आहे. मात्र त्याने २०११ मध्ये पत्नी रामलता हिला घटस्फोट दिला होता. यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्यासोबतच्या त्याच्याबाबत अनेक चर्चा होत होत्या. आता यामध्येच सर्व चर्चा दूर करत भाचीशी तो खरंच विवाहबंधनात अडकणार का हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्रभुदेवाचे मोठे चाहते आहेत. दक्षिण भारतात तसेच भारतात त्याचे नाव आहे. आता त्याच्या लग्नाची चर्चा होत असली तरी ते कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.