‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाले होते प्रभूदेवा; पत्नी आणि तीन मुलांना सोडून तिच्यासोबत राहत होते

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे बाहेर अफेअर असणे यात काही नवीन नाही. इंडस्ट्रीतील अनेक कलाकार असे आहेत. ज्यांचे बाहेर अफेअर सुरु आहे. अविवाहीतच नाही तर विवाहीत कलाकारांचे देखील बाहेर अफेअर सुरु आहे.

कधी कधी कलाकारांचे अफेअर एवढे वाढते की, ते आपण विवाहीत असल्याचे विसरुन जातात. आपण आज अशाच एका कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत. जो विवाहीत होता पण तरीही त्याचे बाहेर अफेअर सुरु होते. त्याने प्रेमासाठी सोळा वर्षांचा संसार मोडला होता.

हा कलाकार कोणी छोटा नसून साऊथचे सुपरस्टार प्रभूदेवा आहेत. प्रभूदेवा साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलीवूडमध्ये देखील प्रसिद्ध चेहरा आहे. त्यांनी आजपर्यंत नृत्यदिग्दर्शन, दिग्दर्शन अभिनय क्षेत्रात नाव कमवले आहे. त्यांच्या डान्सचे करोडो दिवाने आहेत.

प्रभूदेवाने खुप लहान वयात त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. आज ते स्टार आहेत. फिल्मी करिअरसोबतच प्रभूदेवा त्यांच्या वैयक्तिक आयूष्यामूळे देखील अनेकदा चर्चेत असतो. सर्वात जास्त चर्चा प्रभूदेवा आणि अभिनेत्री नयन ताराच्या अफेअरची.

साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत प्रभूदेवाचे अफेअर होते. एका चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. दोघांच्या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नयनताराच्या प्रेमात पागल झालेले प्रभूदेवा विवाहीत होते.

त्यांचे लग्न लतासोबत झाले होते आणि त्यांना तीन मुलं देखील होते. पण कोणाचीही परवा न करता प्रभूदेवाने प्रेमाला निवडले. त्यांनी नयनतारासाठी सोळा वर्षांचा संसार मागे सोडला. ते पत्नी आणि मुलांना सोडून नयनतारासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

नयनतारा मुळ ख्रिश्चन पण प्रभूदेवासाठी तिने धर्मपरिवर्तन करुन घेतले. नयनताराने हिंदू धर्माचा स्वीकार केला. दोघे लवकरच लग्न करणार होते. पण काही कारणामूळे दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघे वेगळे झाले. ब्रेकअप करणे दोघांसाठी देखील खुप कठिण होते.

महत्त्वाच्या बातम्या –

दिलबर गर्ल नोरा फतेहीचा नवीन लुक; फोटो पाहून चाहते झाले आनंदी

सलूनमध्ये गाणे ऐकताना भावाला आली गर्लफ्रेंडची आठवण, रडून रडून झाला बेहाल, पहा व्हिडीओ

बापरे! टेलिव्हिजनवरील सर्वात महागडा कॉमेडीयन आहे कपिल शर्मा; जाणून घ्या एकूण प्रॉपर्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.