‘ही’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे प्रभासची क्रश

बाहुबली’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खुप मोठ्या प्रमाणावर कमाई केली होती. आत्तापर्यंत भारतामध्ये कोणताही चित्रपट एवढा हिट झाला नव्हता. पण बाहुबली चित्रपटाने सगळे रेकॉर्डस् तोडले. आजपर्यंतचा सर्वात चांगला चित्रपट म्हणून बाहुबली चित्रपटाकडे पाहिले जाते.

बाहुबली चित्रपटामध्ये प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा यांसारख्या अभिनेत्यांच्या मुख्य भुमिका होत्या. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सगळे कलाकार खुप जास्त प्रसिद्ध झाले आहेत. खास करुन अनुष्का शेट्टी आणि प्रभास. या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

प्रभास हा साऊथचा सुपरस्टार आहे. त्याने बाहुबली चित्रपटा अगोदरही अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्यामुळे त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. प्रभासचे लग्न झाले नाही. पण अनुष्का शेट्टीसोबत त्याचे नाव अनेकदा जोडले गेले होते.

आज आम्ही तुम्हाला प्रभासच्या खऱ्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत. प्रभास लहान होता. तेव्हा तो एका बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. त्याला ती अभिनेत्री खुप जास्त आवडत होती. म्हणून प्रभासने त्या अभिनेत्रीचा एक चित्रपट दहा वेळेस पाहिला होता.

ही अभिनेत्री होती ‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्री. प्रभास लहान होता. तेव्हा सलमान खान आणि भाग्यश्रीचा मैने प्यार किया चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. म्हणून प्रभासने देखील हा चित्रपट पाहिला होता.

प्रभासला हिंदी येत नव्हती. तरीही भाग्यश्रीसाठी प्रभास हा चित्रपट बघायचा. त्याला भाग्यश्रीच्या सुंदरतेने आणि साधेपणाने वेड लावले होते. एकदा सोडून दहा वेळेस प्रभासने हा चित्रपट बघितला आहे. प्रभास भाग्यश्रीला त्याचे पहिले प्रेम समजतो.

त्याला तिला प्रोपोज करायचे होते. भाग्यश्रीने चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांमध्येच लग्न केले होते. म्हणून प्रभासला खुप वाईट वाटले होते. पण तरीही प्रभासला भाग्यश्री आवडायची. तो तिला चाइल्डहूड क्रश मानतो.

या गोष्टीचा खुलासा स्वतः प्रभासने केला आहे. प्रभास सध्या ‘राधे श्याम’ चित्रपटाचे शुटिंग करत आहे. या चित्रपटामध्ये भाग्यश्रीची देखील महत्त्वाची भुमिका आहे. या चित्रपटाच्या सेटवर प्रभासने या गोष्टीचा खुलासा केला आहे.

भाग्यश्रीला पहिल्यांदा सेटवर पाहिल्यानंतर प्रभास म्हणाला की, आज माझी लहानपणीच्या क्रश सेटवर उपस्थित आहेत. मी लहान होतो तेव्हा भाग्यश्री मला खुप आवडायच्या. त्यांच्यासोबत काम करताना मला खुप आनंद होत आहे’.

महत्त्वाच्या बातम्या –

हेमा मालिनीच्या प्रेमात पागल झाले होते संजीव कुमार काहीही करायला होते तयार

रातोरात सुपरस्टार झालेली संदली सिंन्हा अचानक बॉलीवूडमधून गायब का झाली?

३० वर्ष बॉलीवूडमध्ये असूनही गोविंदासोबत ‘असे’ वागतात बॉलीवूडचे कलाकार

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी दुसऱ्या धर्मातील मुलींशी लग्न केले आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.