बाहुबली प्रभासला लॉकडाऊनचा जबर फटका, कंपनीवर आहे १००० कोटींचे कर्ज

कोरोनामुळे पुर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. संपुर्ण देश अनेक दिवस बंद होता. या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण कर्जबाजारी झाले. अनेक जणांचे उद्योगधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या. याचा सिनेसृष्टीलाही खुप फटका बसला.

याचदरम्यान, साउथचा सुपरस्टार प्रभासचेही खुप मोठे नुकसान झाले आहे. प्रभासच्या प्रोडक्शन हाऊसला १ हजार कोटींचा जबर फटका बसला आहे. प्रभासची प्रोडक्शन कंपनी यूव्ही क्रिएशन्स राधे श्याम हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे.

या चित्रपटात प्रभास आणि पुजा हेगडे मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटाचे शुटिंग युरोपमध्ये झाले आहे आणि येत्या ३० जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाकडून प्रभासला आणि त्याच्या टिमला मोठ्या आशा आहेत.

या चित्रपटात प्रभास लव्हर बॉयची भुमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार हे आहेत. या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला होता. या टिझरमध्ये पुजा हेगडे प्रभासला म्हणते की स्वताला रोमियो समजतोस का? त्यावर प्रभास म्हणतो की, नाही त्याने प्रेमासाठी जीव दिला होता, मी त्या टाइपचा नाही.

प्रभासचे यासोबत अनेक चित्रपट येणार आहेत. राधे श्यामसोबत प्रभास आदिपुरूषमध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहे. यामध्ये भगवान श्रीरामांची भुमिका प्रभास साकारणार आहे. अजय देवगण यामध्ये भगवान शंकराची भुमिका साकारणार आहेत. साय-फाय या चित्रपटातही प्रभास झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या
नातीसाठी कायपण! ७४ वर्षांचे आजोबा नातीच्या शिक्षणासाठी दिवसरात्र चालवताहेत रिक्षा
तेरी मेरी यारी! विहिरीत पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लावली प्राणाची बाजी
भलाईचा जमानाच नाही राहिला! गाईला वाचवण्यासाठी गेले आणि गाईने केली अशी अवस्था, पहा व्हिडीओ
..म्हणून रिक्षाचालकाने परत केले चाळीस लाखांचे दागिने; किस्सा वाचून तुम्हाला कौतुक वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.