एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांनी देखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यादरम्यान शिवसेनेचे(Shivsena) खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.(prabhani mp sanjay jadhav meet to shivsena uddhav thakre)
यादरम्यान परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. परभणी हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे हा बालेकिल्ला अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुधवारी परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम उपस्थित होते. याशिवाय परभणीमधील शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश ढगे, पंढरीनाथ धोंडगे देखील हजर होते. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार, असे परभणीमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षातील खासदारांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव उपस्थित नव्हते. खासदार संजय जाधव यांची प्रकृती नीट नसल्यामुळे त्यांना या बैठकीला उपस्थित राहता आले नाही. राज्यात सत्तांतर होत असताना खासदार संजय जाधव आषाढी वारीमध्ये होते.
त्यामुळे परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेता आली नव्हती. म्हणून खासदार संजय जाधव यांनी परभणीमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो भक्कमपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहील, असे खासदार संजय जाधव यांनी भेटीदरम्यान सांगितले.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत परत यावं, असं आवाहन करत आमदार संतोष बांगर शिवसैनिकांसमोर रडले देखील होते. पण नंतर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
लंडनच्या रस्त्यावर पाठकबाईंनी पकडली राणादाची कॉलर, व्हायरल व्हिडिओची चर्चा
एकनाथ शिंदे गोत्यात, मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार? न्यायालयाने दिला दणका
ग्लोबल टिचर डिसले गुरूजींना धक्का! राजीनामा दिला तरी आतापर्यंतच्या पगाराची वसूली होणार