मोठी बातमी! मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल जाहीर केला आहे. तेव्हापासून मराठा समाज आक्रमक झाला असून पुन्हा मोर्चे काढण्याच्या तयारीत मराठा समाज आहे.

यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी राज्यभर दौरा केला. यामध्ये त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या देखील भेटी घेतल्या. यामध्ये शरद पवार यांची देखील भेट त्यांनी घेतली.

आता ते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत. तसेच त्यांनी २८ तारखेला आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत ते मराठा आरक्षणासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी देखील त्यांनी आरक्षण मिळत असेल तर मी आता राजीनामा देईल, असे त्यांनी म्हटले होते. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यात काही मराठा समाज हा गरीब असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे यांनी एकत्र येण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी काल शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना सांगितले आहे.

यामुळे आता संभाजीराजे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरून संभाजीराजे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

एकीचे बळ! मधमाश्यांनी उघडले प्लास्टीकच्या बाटलीचे झाकण, व्हिडीओ पाहून अवाक व्हाल

मोठी बातमी! २ हजारांची नोट बंद होणार.? १० रुपयांच्या सिक्क्यांबाबत RBI ची महत्वाची माहिती

संभाजीराजेंनी फडणवीसांनी हात जोडून सांगीतलं तुझं माझं करू नका, समाजासाठी एकत्र या; वाचा काय ठरलं भेटीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.