मुलं जन्माला घालण्यात मुस्लिम एक नंबरवर; अहवालातून धक्कादायक खुलासे आले बाहेर

लोकसंख्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये, अमेरिकन थिंक टँकच्या अहवालात भारताबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे की इतर धर्मांच्या तुलनेत मुसलमान भारतात सर्वाधिक मुले जन्माला घालतात.

यानंतर हिंदूंची संख्या येते आणि जैन धर्माला माननारे कमीत कमी मुले जन्माला घालतात. अमेरिकेतील थिंक टँक ‘प्यू रिसर्च’ च्या ताज्या अहवालात असेही म्हटले आहे की जवळजवळ सर्व धर्मांमध्ये मुलांच्या जन्मदरात घट झाली आहे.

अशी झाली घसरण
अमेरिकेच्या थिंक टँक ‘प्यू रिसर्च’ ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की भारतीय मुस्लिमांमध्ये एकूण बाल जन्मदरात घट झाली आहे. हा दर 1992 मध्ये प्रति महिला 4.4 मुलांचा होता, जो 2015 मध्ये 2.6 मुलांवर आला.

तथापि, अजूनही मुसलमानच सगळ्यात जास्त मुले जम्नाला घालत आहेत. प्यू रिसर्चने म्हटले आहे की, ‘भारतातील प्रत्येक धार्मिक गटातील मुलांच्या जन्मदरात घट झाली आहे. यामध्ये बहुसंख्य हिंदू, अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन यांचा समावेश आहे.

अहवालानुसार, मुस्लिम अजूनही भारतातील मोठ्या धार्मिक गटांमध्ये सर्वात जास्त मुले जन्माला घालत आहेत. हिंदू (२.१) मुले जम्नाला घालतात. जैन धर्माला माननारे लोक सर्वात कमी (1.2) मुले जन्माला घालत आहेत.

सामान्य पॅटर्न 1992 सारखाच आहे, जेव्हा मुस्लिमांमध्ये 4.4 च्या उच्च दराने मुले जन्माला येत होती. यानंतर हिंदू 3.3 च्या दराने मुलांना जन्म देत होते. प्यू अहवालात म्हटले गेले आहे की, मुस्लिम आणि हिंदू यांच्यातील मुलांच्या जन्माच्या दरामधील व्यापक अंतरही कमी झाले आहे.

लोकसंख्येत खूप योगदान आहे
प्यू रिसर्चने म्हटले आहे की ही आकडेवारी दर्शवते की भारतातील मुस्लिम लोकसंख्या इतर धार्मिक गटांपेक्षा वेगाने वाढली आहे. तथापि, १९५१ मध्ये पहिल्या जनगणनेपासून, जन्मदर कमी झाल्यामुळे एकूणच सर्व धार्मिक गटांमध्ये थोडासा बदल झाला आहे. भारताच्या 1.2 अब्ज लोकसंख्येच्या 79.8 टक्के हिंदू आहेत. हे 2001 च्या जनगणनेपेक्षा केवळ 0.7 टक्के कमी आहे.

अशी आहे बाकीच्या धर्मांची परिस्थिती
त्याचबरोबर 2001 ते 2011 दरम्यान मुस्लिमांची लोकसंख्या 13.4 टक्क्यांनी वाढली आहे. ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 6 टक्के आहेत. त्यांची लोकसंख्या 1951 पासून आतापर्यंत स्थिर आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर धार्मिक लोकसंख्येत बदल होण्यामागे जम्नदर हे सर्वात मोठे कारण असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिलचा “तो” व्हिडिओ समोर आला…व्हिडिओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल
दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजप युती ? केंद्रीय मंत्र्याने सांगितला तडजोडीचा फाॅर्म्युला
“५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होतात, मग ११९ वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.