धक्कदायक! पुरेशी झोप घेतली नाहीतर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार; वाचा सविस्तर

मानवी शरीराला पुरेशी झोप अत्यंत महत्वाची आहे. डॉक्टरही प्रत्येकाला ६ ते ८ तासांची पुरेशी झोप घेण्यास सांगतात. रोज पुरेशी घेतल्याने माणसाचे आरोग्य व्यवस्थित राहते. त्याचा चांगला परीणाम आपल्या जीवनशैलीवरही होतो.

अशात जर तुम्ही रोज पुरेशी झोप घेतली नाही, तर आपल्याला त्याचे वाईट परीणाम दिसून येतात. चांगली झोप न मिळाल्यामुळे शारीरीक आणि मानसिक आजरही होत असतात. हे आपल्याला माहित आहे.

आता पुरेशी झोप घेतली नाही तर मृत्यु पण ओढावू शकतो, अशी धक्कादायक माहिती एका अहवालातुन समोर आली आहे. सीएनएनने दिलेल्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांना रात्री झोप येत नसेल किंवा ते पुरेशी झोप घेत नसेल, त्यांना डिम्नेशिया नावाचा आजार होण्याची शक्यता आहे.

पुरेशी झोप न घेतल्यास या गोष्टीचा शरीरावर परीणाम होत असतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळेच लवकर मृत्युही होऊ शकतो, अशी माहिती सीएनएनच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.

२०११ ते २०१८ या काळातील अनेक लोकांच्या झोपेच्या सवयीचा डेटा संशोधकांनी जमा केला आहे. ज्या लोकांना झोप येत नाही, त्या लोकांना रोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, असे यातून समोर आले आहे. जर्नल ऑफ स्लिप रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या डेटाचं विश्लेषण नॅशनल हेल्थ अँड एजिंग स्टडीने केलं आहे.

या संशोधनातून जे निष्कर्ष समोर आले आहे, त्यानुसार, रात्रीची झोप ही आपल्या आरोग्यासाठी खुप महत्वाची आहे पुरेशी झोप घेतल्यास आपली न्युरोलॉजिसिस्टीम पुर्णपणे कार्यरत राहते. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याची शक्यता आहे, असे हार्वर्ड मेडीकल स्कुलमधील रेबिका रॉबिन्सन यांनी म्हटले आहे.

कमी झोप घेतली तर डिम्नेशिया आजार होण्याची शक्यता असते. कमी झोप घेण्याऱ्या ४५ टक्के लोकांसाठी हा आजार खरोखरच धोकादायक आहे. तसेच कमी झोपेमुळे मधूमेह आणि हृदयविकारासारखे आजार होण्याची शक्यता असते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या-

भल्याभल्यांना नडणाऱ्या कंगणाबाबत ‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ने केली ‘ही’ गोष्ट; पाहून तुम्हीही थक्क व्हाल
अभिनेत्रींपेक्षाही हॉट आहे ‘ही’ योगा टीचर; महिन्याला कमवते 73 लाख रुपये
श्रावणबाळच! स्कूटरवरून आईला घेऊन कश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्व तीर्थस्थळांना भेट दिली; नोकरीही सोडली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.