धुणी भांडी करून मुलाला आईने शिकवले, आता मुलाने झोपडपट्टीतून गाठले थेट इंग्लंड, पण..

आर्थिक परिस्थिती जरी बिकट असली तरी त्यावर मात करता आली पाहिजे. अशाच एका संघर्षाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कल्पना आढाव गेल्या १४ वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कार्यरत आहेत.

त्या कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा लहान होता तेव्हापासून त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाला आपण खुप शिकवायचे. अमित कल्पना आढाव असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

त्यांनी आपल्या मुलाला धुनीभांडी करून उच्चशिक्षण दिले. अमितने बॅचलर्स इन फिजिओथेरपीचं शिक्षण घेतले आहे. त्याला इंग्लंडमध्ये पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. पण त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला इंग्लंडला जाण्यासाठी अडथळा येत आहे.

कल्पना आढाव यांनी एका वृत्तवाहिनीला आपली व्यथा मांडली आहे. कल्पना आढाव आणि त्यांचा मुलगा अमित हे दोघेही पिंपरीमधील झोपडपट्टीमध्ये राहतात. एका दहा बाय दहाच्या खोलीत दोघे राहतात.

अमित फक्त १ महिन्यांचा होता तेव्हा त्याचे वडिल दोघांना सोडून गेले. त्यानंतर त्याच्या आईनेच त्याचा सांभाळ केला. घर चालविण्यासाठी कल्पना यांनी धुनी भांडी केली. अमितच्या शिक्षणासाठी त्यांना खुप कसरत करावी लागली होती.

त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती तरीही त्या खचल्या नाहीत. त्या महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक म्हणून रूजू झाल्या. त्यांनी केवळ ३ हजार पगाराने सुरूवात केली होती. सध्या त्यांना १४ हजार रूपये पगार आहे.

त्यांनी आपल्या मुलाला उच्चशिक्षित बनविण्यासाठी खुप हातभार लावला. अमित सध्या एक खाजगी रूग्णालयात इंटर्नशिप करत आहे. त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी म्हणजे स्पोर्ट्स एक्सरसाईज अँन्ड मेडिसिनचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लडमधून संधी उपलब्ध झाली आहे.

मात्र त्यांची परिस्थिती खुप बिकट आहे. इंग्लडला जाण्यासाठी खुप खर्च होणार आहे आणि इतके पैसै त्यांच्याकडे नाहीत. काहीही झालं तरी परिस्थितीसमोर झुकायचं नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांना सध्या आर्थिक मदतीची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या
कसा काय रातोरात स्टार झाला एक साधारण जिंगल बनवणारा मुलगा, वाचा त्याची यशोगाथा
कंगणा म्हणते, पंंतप्रधान मोदी देशासाठी पित्यासमान आहेत; पंतप्रधान म्हणजेच देश आहे
आश्चर्यकारक! कबूतरांचा सांभाळ करून सांगलीचा हा पठ्या कमावतोय लाखो रूपये
..आणि सलूनवाल्याने पेरला काळा गहू, काढणीच्या आधीच गव्हाला आलीये मोठी मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.