बाॅलीवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री गोव्यातील बीचवर विवस्र पळाली; पोलीसांनी ठोकल्या बेड्या

गोवा | आपल्या बोल्ड फोटोजमुळे आणि व्हिडिओजमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री पूनम पांडे हिला पोलिसांनी अटक केली आहे. पूनम पांडेने शूट केलेल्या व्हिडिओमुळे तिला अटक करण्यात आली आहे.

गोव्यात शूट केलेला तिचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षाने या व्हिडिओवरून सरकारवर टीका केल्यानंतर गोवा पोलिसांनी ही कारवाई केली.

हा व्हिडिओ पूनम पांडेने गोवाच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट केला होता. या व्हिडिओवर विरोधकांनी प्रचंड आक्षेप केला आणि सध्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना तसेच सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारे धरणावर जाऊन शूटिंगला परवानगी कसकाय दिली जाते? असा प्रश्न उपस्थित केला गेला.

पूनम पांडे सिकरी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबली होती तिथुन गोवा पोलिसांनी तिला अटक केली. कलम २९२ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाईसाठी तिला कानकोण येथे नेण्यात आले आहे.

दरम्यान, शुटिंगची परवानगी देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असल्याने त्यांनी ही जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणीही गोवा फॉरवर्डने केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.