तुम्हाला माहिती आहे का? पुनम ढिल्लोने भारतात पहिल्यांदा व्हॅनिटी वॅन लाँच केली होती

८० आणि ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये पुनम ढिल्लोंच्या नावाचा समावेश होतो. खुप कमी वयातच त्यांनी मिस इंडीयाचा ताज जिंकलेल्या पुमनने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.

‘नुरी’ चित्रपटाने त्यांना बॉलीवूडमध्ये स्टार बनवले. या चित्रपटानंतर इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे पुनमचे चर्चे होते. अनेक मोठे दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्यासोबत काम करायला तयार होते. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करुन इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली.

पुनमने त्या काळातील सगळ्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. जसे की, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, राज बब्बर, विनोद खन्ना, शत्रूघ्न सिन्हा, मिथून चक्रवर्ती अशा मोठ्या मोठ्या सुपरस्टार्ससोबत त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनयासोबतच त्यांनी अजून एक महत्त्वाचे काम केले. ज्यामुळे त्यांना बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख मिळाली. पुनम ढिल्लोने भारतात कलाकारांसाठी व्हॅनिटी वॅन लाँच केले. खुप कमी लोकांना याबद्दल माहिती असेल. पण ही गोष्ट खरी आहे पुनमनेच भारतात व्हॅनिटी वॅन आणली.

हा किस्सा आहे त्यावेळेसचा ज्यावेळी पुमन अमेरिकेत एका चित्रपटाची शुटींग करत होती. या शुटींग वेळी पुनमने पहिल्यांदा व्हॅनिटी वॅन पहिली आणि शॉक झाली. पुर्ण माहिती काढल्यानंतर त्यांना समजले की, कलाकारांसाठी ही खुप कामाची गोष्ट आहे.

पुमनला ही वॅन खुप आवडली आणि त्यांनी ठरवले की, त्या भारतात व्हॅनिटीला घेऊन जाणार आणि तिथल्या कलाकारांना आराम देणार. त्यानंतर काय १९९१ मध्ये पुनमने एका कंपनीसोबत मिळून २५ व्हॅनिटी वॅन बनवल्या आणि त्यांना भारतात लाँच केले.

सुरुवातीला बॉलीवूडमधील लोकांना पुनमचा हा निर्णय चुकीचा वाटला. पण त्यांनी हार मानली नाही. पुमनचे प्रयत्न बघून एका दिग्दर्शकाने वॅन खरेदी केली आणि त्याला ती खुप आवडली. हळूहळू सगळीकडे व्हॅनिटी वॅन प्रसिद्ध होऊ लागली.

आजच्या घडीचा विचार केला तर आज बॉलीवूडमधल्या प्रत्येक कलाकाराकडे व्हॅनिटी वॅन आहे. वॅनशिवाय कलाकारांचे काम होत नाही. पण याची सुरुवात मात्र पुनम ढिल्लोने केली होती. आज त्या चित्रपटांमध्ये काम करत नसल्या तरी खुप प्रसिद्ध आहेत.

पुनमने निराशा, रेड रोज, ये वादा राहा, तेरी कसम, सोनी महवाल असे अनेक सुपरिहट चित्रपट केले. या चित्रपटातून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली होती. त्या बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाऊ लागल्या होत्या.

त्या दिसायला खुपच सुंदर होत्या म्हणून त्यांना विशेष चाहता वर्ग होता. त्यांची मुलगी पलोमा धील्लों देखील दिसायला त्यांच्यासारखीच आहे. पलोमा दिसायला खुपच सुंदर, हॉट आणि ग्लॅमर्स आहे. ती अनेकांची स्वप्न सुंदरी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

गोविंदा नसते तर अजय देवगन बॉलीवूड सोडून घरी बसले असते; वाचा पुर्ण किस्सा

किसिंग सीन दिल्यानंतर रागावलेल्या बायको मनवण्यासाठी ‘हे’ काम करायचा इम्रान हाश्मी

‘लावारिस’ चित्रपट पाहील्यानंतर राजेश खन्ना म्हणाले की, थोड्या पैशांसाठी अमिताभ काहीही करु शकतो

मुनमून दत्ताची पहिली सॅलरी होती १२५ रुपये; अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.