इतकी बदलली DDLJ मधील छुटकी पुजा रूपारेल, शाहरूख खानची मेव्हणी आता करते ‘हे’ काम

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात राज आणि सिमरन यांना एकत्र आणण्यासाठी काजोलची छोटी बहीण छुटकीने त्यांची खुप मदत केली. लोकांनी तिची खुप प्रशंसा केली होती. छुटकीचा रोल लोकांना खुप आवडला होता.

पण तुम्हाला माहिती आहे का की ती छुटकी म्हणजे खऱ्या आयुष्यातील पूजा रूपारेल आता ४० वर्षांची झाली आहे. या सुपरहिट चित्रपटात छुटकीचा रोल केल्यानंतर लाईमलाईटमध्ये आलेली पुजा वर्ष १९९५ पासून आतापर्यंत इतकी बददली आहे की तिचे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

तिच्याबद्दल बोलायचे झाले तर भलेही पूजा सध्या चित्रपटात काम करत नाही पण बॉलिवूडमधील अनेक कलाकारांबरोबर तिच्या चांगल्या ओळखी आहेत. ती सोशल मिडीयावरही नेहमी ऍक्टीव्ह असते. दररोज ती आपले फोटो शेअर करत असते.

पूजाचे बॉलिवूड कनेक्शनही खुप खास आहे. नात्यामध्ये ती सोनाक्षी सिन्हाची बहिण आहे. म्हणजे पूजाची आई आणि सोनाक्षी सिन्हाची आई एकमेकांच्या बहिणी आहेत. पूजाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती जरी सध्या अभिनेत्री म्हणून काम करत नाही.

ती जे काम करते ते काम करत असताना तिला अभिनय करणे अवघड जात होते. पूजा एक सिंगर आहे, स्टॅडअप कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर आणि मार्शल आर्ट ट्रेनरसुद्धा आहे. पूजाने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेच्या आधी जॅकी श्रॉफच्या किंग अंकल या चित्रपटात काम केले होते.

२०१५ मध्ये तिने एक्स- पास्ट इज प्रेझेंट हा चित्रपट केला होता जो फ्लॉप झाला होता. यानंतर २०१६ मध्ये तिने एका गुजराती चित्रपटात लीड एक्ट्रेस म्हणून काम केले होते ज्याचे नाव होते पेला आधी अक्षर होते.

महत्वाच्या बातम्या
कोरोनाच्या संकटात देश कोण चांगलं सांभाळू शकतं नरेंद्र मोदी कि राहूल गांधी ? जनता म्हणाली…
करिअर वाचवण्यासाठी स्वत: च्याच चित्रपटाचे तिकीट खरेदी करत होता ‘हा’ अभिनेता
निलेश लंकेंच्या कामाचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले कौतुक, म्हणाले…
पत्नीने पतीला रंगे हात पकडले, दुसऱ्या महिलेसोबत एका रूममध्ये होता बंद, मग..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.