पूजा लोंढे हत्या प्रकरणी माहेर सिन्नरमध्ये तीव्र आक्रोश, नागरिक रस्त्यावर, नराधमांवर कारवाईची मागणी

नाशिक । पाच महिन्यापूर्वी विवाह झालेल्या सिन्नरचे माहेर असलेल्या पूजा लोंढे हीची कुंभारी ता. कोपरगाव येथे तिच्या सासरच्यांनी जाळून हत्या केल्याचे म्हटले जात आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता मात्र नागरिक आक्रमक झाले आहेत. यामुळे आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

कोपरगाव पोलिसांनी तातडीने याची दखल घ्यावी, गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहरातील विविध संघटनांनी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यानंतर सायंकाळी कॅंडल मार्च काढला होता. यामुळे आता हे प्रकरण तापले आहे.

पोलिसांनी दखल घेण्यास टाळाटाळ केल्याने पूजाला जाळून मारणाऱ्या संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, असे निवेदन भाजपकडून कोपरगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक देसले यांना देण्यात आले आहे. यामुळे आता त्यांच्यावर मोठी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

यानंतर पोलिसांनी नवरा सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, पूजाने घर बांधण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत यासाठी तिचा छळ करण्यात येत होता. मानसिक, व शारीरिक तसेच शिवीगाळ करत २६ जुलैला सासरच्यांनी तिला पेटवून दिले होते. यामध्ये तिचा मृत्यू झाला.

ती ९० टक्के भाजली होती, उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. पूजाला न्याय मिळायलाच हवा अशी मागणी आता करण्यात येत आहे. पूजाला न्या द्या, नराधमांना कठोर शिक्षा द्या‘ अशा मजकुराचे फलक घेऊन क्रांतिसूर्य प्रतिष्ठान, शिवसेना तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सिन्नरकर रस्त्यावर उतरले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण संजय राठोडांशी ९० मिनिटं बोलली, धक्कादायक माहिती उघड

सात टाके पडल्यानंतरही मागे नाही हटला हा पठ्ठ्या, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरशी नडला, पण…

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर ‘या’ दिवशी ‘देवमाणूस’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.