पुजा हेगडेने मुंबईमध्ये खरेदी केला स्वतः चा आशियाना; पहा घराचे फोटो

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांकडे पैशाची कमी नसते. करोडो रुपये असणारे कलाकार अनेक महागड्या घरांचे मालक असतात. पण त्यांना त्यांच्या पहील्या घराचा आनंद खुप वेगळा असतो. कलाकार पहीले घर खरेदी करतात तेव्हा त्यांच्या भावना खुपच वेगळ्या असतात.
इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सध्या नवीन घरं खरेदी करत आहेत. अशाच कलाकरांच्या यादीत अभिनेत्री पुजा डेगडेच्या नावाचा समावेश झाला आहे. पुजाने मुंबईमध्ये नवीन घर खरेदी केले आहे. तिने तिच्या सोशल मिडीयावर या गोष्टीची माहीती दिली आहे.
पुजा हेगडे बॉलीवूडसोबतच टॉलीवूडमधले प्रसिद्ध नाव आहे. तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खुप कमी वेळात नाव मिळवले आहे. त्यासोबतच ती बॉलीवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
पुजाने हृतिक रोशनसोबत मोहोणजो दारो चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करू शकला नाही. पण पुजाने मात्र तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
बॉलीवूडसोबतच पुजाने साऊथमध्ये देखील काम करायला सुरुवात केली. साऊथमध्ये तिला पहिल्या चित्रपटापासूनच चांगली ओळख मिळाली.त्यानंतर तिने साऊथमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यासोबतच ती साऊथची टॉपची अभिनेत्री झाली.
पुजा आत्ता यशस्वी अभिनेत्री झाली आहे. त्यामुळे तिच्याकडे पैशांची देखील काही कमी नाही. तिने चित्रपट आणि जाहिरातींमधून करोडो रुपये कमवले आहेत. ती करोडों संपत्तीची मालकीण झाली आहे.
पुजाने काही दिवसांपूर्वी मुंबईत स्वतः चे नवीन घर घेतले आहे. या घराची किंमत ११५ करोड रुपये आहे. पुजाने स्वतः च्या कमाईतून हे घर घेतले आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे घर खुप खास आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या गोष्टीची माहिती दिली होती.
सध्या पुजा घराच्या सजावटीमध्ये व्यस्त आहे. ती काम करत असली तरी वेळ काढून मुंबईला येते आणि घराचे काम बघते. तिने घराच्या सजावटीसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. तिने अनेक महागड्या सजावटीच्या वस्तू घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
सलमानसोबत ब्रेकअप करणे ऐश्वर्याला पडले होते चांगलेच महागात; करिअर झाले होते खराब
कुठे गायब झाली ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील खडूस खलनायिका सीमा?
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.