पूजा चव्हाण आत्मह.त्या! पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच तृप्ती देसाईं जोडले हात अन्…

मुंबई : रविवारी दुपारी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी परळी येथील वसंत नगर तांडा येथे पूजाच्या नातेवाईकांची भेट देऊन विचारपूस केली. पूजा चव्हाणच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस असं काहीही लागलेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारला लक्ष केले जात आहे.

अशातच तृप्ती देसाई यांनी थेट पूजाच्या नातेवाईकांची भेट घेतली. ‘सत्ताधारी पक्ष आपल्या मंत्र्यांना आणि सत्ता वाचविण्यासाठी हे प्रकरण दाबत आहे. या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी आम्ही लढणार आहोत. यात ज्यांची नावे आली आहेत त्यांची नार्को टेस्ट करून सीबीआय चौकशी करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.

याचबरोबर यावेळी त्यांनी आपण पूजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, पालकांची तक्रार नसली तरी जे काही पुरावे पुढे येत आहेत त्यावरून पोलिसांनी कारवाई करावी,’ अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘पूजाच्या मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी आणि दोषींवर कारवाई होण्यासाठी तुम्ही पुढे यावे कुणाचा दबाव असेल तर सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत असे आवाहन तृप्ती देसाई यांनी पूजाच्या वडिलांना केले. मात्र, आमचा कुणावर कसलाही संशय नसून कोणाविरोधातही तक्रार नसल्याचे वडिलांनी सांगितले. यावर तृप्ती यांनी थेट हात जोडले आणि आल्या पावली परत तेथून फिरल्या.

महत्त्वाच्या बातम्या
सावधान! कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपेक्षाही जास्त धोकादायक, एम्स प्रमुखांनी केलं सावध
पुजाला यवतमाळला मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं; नातेवाईकांचा गंभीर आरोप
खरंच की काय? राखी म्हणतीये, ‘पोटाचा घेर वाढला तर रोमान्स होत नाही’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.