मंत्री कार्यकर्त्याला सांगतात ‘आधी त्या मुलीचा मोबाईल ताब्यात घे’; आॅडीओ क्लिप व्हायरल

मुंबई | विदर्भातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने आत्मह.त्या केल्याची चर्चा सध्या सुरू झाली असून, सोशल मीडियावर या प्रकरणाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हायरल ऑडीओ क्लिपने आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या ऑडिओमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असेदेखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असादेखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पोलीस तपासात पूजाच्या आईवडिलांनी आत्महत्येबद्दल आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले आहे.

त्याच वेळी आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात कथित मंत्री व त्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे संभाषण झाले. त्या वेळी तो कार्यकर्ता त्या युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच होता आणि त्या कथित मंत्र्याने सदर युवतीचा मोबाइल ताब्यात घेण्याचा आदेशही दिल्याचे या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होते.

“पूजा चव्हाणच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”
‘पुजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना भेटून या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांनी या प्रकरणातील सत्य समोर आणावे, असे म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”
पुण्यात आत्मह.त्या केलेल्या तरुणीचे राज्यातील ‘या’ मंत्र्यासोबत कनेक्शन
शिवसेनेच्या अडचणी वाढल्या! उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार ईडीच्या रडारवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.