पुजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणात सेनेच्या मंत्र्याचे कनेक्शन उघड? ‘ती’ क्लिप व्हायरल

मुंबई | विदर्भातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने आत्मह.त्या केल्याची चर्चा सध्या सुरू झाली असून, सोशल मीडियावर या प्रकरणाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हायरल ऑडीओ क्लिपने आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या ऑडिओमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असेदेखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असादेखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पोलीस तपासात पूजाच्या आईवडिलांनी आत्महत्येबद्दल आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले आहे.

त्याच वेळी आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात कथित मंत्री व त्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे संभाषण झाले. त्या वेळी तो कार्यकर्ता त्या युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच होता आणि त्या कथित मंत्र्याने सदर युवतीचा मोबाइल ताब्यात घेण्याचा आदेशही दिल्याचे या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होते.

“वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पोलिसांनी वाट न बघता थेट संजय राठोड यांच्या मुसक्या आवळा, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

याबाबत माध्यमांशी बोलताना त्या म्हणतात, ‘पूजा चव्हाणची आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर दोन दिवसात ज्या काही अपडेट येत आहेत ते व्हायरल होत आहे. काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. त्या सर्व क्लिप धक्कादायक आहेत. या सगळ्या गोष्टींचा रोख मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मानसीने शेअर केला लग्नसोहळ्याचा संपूर्ण व्हिडीओ; मेहंदीपासून संगीतपर्यंत ‘अशी’ केली धमाल
‘मला नवऱ्याकडे जायचंय’; असं म्हणत नवऱ्यासाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी; पहा व्हिडीओ
नाथाभाऊ गरजले; ‘ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.