पूजा चव्हाण प्रकरणात ‘गबरु’ची एन्ट्री; पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकासह विशेष करून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपाकडून आरोप करण्यात आले आहेत. अशातच आता पूजा चव्हाण प्रकरणात गबरुची एन्ट्री झाली आहे.

पूजा आणि ‘गबरुशेठ’मधील संभाषण समोर आले आहे. नव्या ऑडिओ क्लिपमुळे प्रकरण चिघळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पूजाचे व्हायरल झालेले नवे फोटोंनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. कारण या फोटोत केकवर नाव लिहिलेला हा गबरु नक्की कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पूजाच्या लॅपटॉपमधील अनेक व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स समोर आले आहेत. विशेष बाब म्हणजे गबरूच्या नावाच्या केकचे फोटो या लॅपटॉपमध्ये सापडले आहेत. हा गबरू पूजाला आपल्या हातानं केक भरवतानाचा फोटोही त्यात आहे. त्यामुळं हा गबरू नेमका कोण, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

नवीन झालेल्या व्हायरल फोटोमध्ये एक माणूस आपल्या हाताने पूजा चव्हाणला केक भरवताना पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर त्या हातावर शिवसेनेचा धागा देखील असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये पूजा वनमंत्री असे नाव लिहिलेला केक कापते आहे.

माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात
सोशल मीडियावर व्हायरल पूजासोबतच्या फोटोंबाबत राठोड म्हणाले, गेली ३० वर्षे सामाजिक-राजकीय जीवनात आहे. यानिमित्ताने अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. मी १५ दिवस गायब नव्हतो. मुंबईतील फ्लॅटवरून शासकीय कामकाज करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
अंधश्रद्धेचा कळस! सापाने दंश केल्यानंतर मुलीला नेले बाबाकडे; उपचाराअभावी सोडले प्राण
पहा सैफ- करिनाच्या बाळाची पहिली झलक; सोशल मिडीयावर फोटो होतायेत तुफान व्हायरल
#ArrestRamdev : फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी; WHO म्हणते…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.