पूजा भट्टने ड्रग्स घेण्यामागचे सांगितले ‘हे’ विचित्र कारण; सोशल मिडीयावर ट्रोल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन सापडल्यानंतर NCB या प्रकरणात तपास करत आहे. NCB ने केलेल्या तपासात फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींची नावे या प्रकरणात समोर आले आहे. यावर आता अभिनेत्री पूजा भट्ट हिने वक्तव्य केले आहे.

पूजा भट्ट ही आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. तिने ट्विटरवर ड्रग्स प्रकरणाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. जे लोक दुःख कमी करण्यासाठी ड्रग्सचे सेवन करतात, अशा लोकांची कोणाला काळजी आहे का? या लोकांची अवस्था व समस्या तुम्हाला माहित आहेत का? असा सवाल पूजा भट्ट ने केला आहे.

आपल्या ट्विटमधून तिने आर्थिक व मानसिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांवर प्रश्न उपस्थित केला आहे. पुढे ती म्हणाली आहे की, जे लोक ड्रग्स घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी होईल. अशा शेवटच्या उपेक्षित लोकांबद्दल कोणाला काळजी आहे का? असाही सवाल ट्विटरच्या माध्यमातून तिने केला आहे.

आपल्या नशिबी आलेली गरिबी आणि दुःख यांसारख्या कारणामुळं काही लोकं ड्रग्स पदार्थांसारख्या गोष्टींचा वापर करत असतात. या लोकांचे आयुष्य सुधारण्यात कोणाला रस आहे का? असं ट्विट पूजा भट्टने केले आहे. तिचे हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे.

पूजाने केलेल्या या ट्विटमुळे ती सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे. या ट्विटमुळे तिला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. अनेक जणांनी या ट्विटला रिप्लाय देताना पूजाला झापले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.