‘विरासत’ चित्रपटातील अभिनेत्री पुजा बत्राने केले आहे खलनायकासोबत लग्न; पहा फोटो

बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री कधीच खलनायकाच्या होत नाहीत. खलनायकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्या हिरोच्याच गळ्यात माळ टाकतात. बॉलीवूडच्या प्रत्येक चित्रपटाची हिच कहानी असते. चित्रपटांमध्ये खलनायक तर असतात. पण त्यांना कधीच अभिनेत्री भेटत नाहीत.

चित्रपटांमध्ये ही गोष्ट शक्य नसली तरी अभिनेत्रींनी खऱ्या आयूष्यात मात्र ही गोष्ट खरी करुन दाखवली आहे. बॉलीवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी खलनायकसोबत लग्न केले. चला कर मग जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी खऱ्या आयूष्यात खलनायकाला आपला जीवनसाथी बनवले.

१ रेणूका शहाणे – या यादीत सर्वात पहीले नाव येते ते म्हणजे अभिनेत्री रेणूका शहाणेचे. कारण त्यांनी बॉलीवूडच्या सर्वात भयानक खलनायकासोबत लग्न केले आहे. हम आपके है कोन फेम अभिनेत्री रेणूका शहाणेने बॉलीवूडचे प्रसिद्ध खलनायक आशूतोष राणेसोबत लग्न केले आहे.

आशूतोष बॉलीवूडच्या सर्वात भयानक खलनायकांपैकी एक आहेत. त्यांनी संघर्षसारख्या चित्रपटामध्ये खलनायकाची भुमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण केली होती. पण त्यांच्या प्रोफेशन आयूष्याचा कोणताही विचार न करता रेणूका त्यांच्या प्रेमात पडल्या. २००१ मध्ये दोघांनी लग्न केले होते.

२ परेश रावल – ९० च्या दशकातली सर्वात प्रसिद्ध खलनायक होते परेश रावल. त्यांनी पुढे जाऊन करिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या भुमिका केल्या. पण त्यांना त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेसाठी जास्त ओळखले जाते. परेश रावलच्या पत्नी स्वरुप संपत मिस इंडिया आहेत.

स्वरुप संपतने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. पण त्यांना अभिनयात रुची नव्हती. म्हणून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. चित्रपटांतील खलनायकासोबत त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. गेले अनेक वर्ष दोघे सुखाचा संसार करत आहेत.

३ अनूपम खेर – अनूपमने खेर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक खलनायकाच्या भुमिका केल्या आहेत. चित्रपटातील या खलनायकावर अभिनेत्री किरण रावचे मन आले आणि दोघांनी लग्न केले. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे.

४ शक्ति कपूर – अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेच्या बहीण शिवांगी कोल्हापुरेने शक्ति कपूरसोबत लग्न केले. शिवांगी स्वत देखील अभिनेत्री होत्या. पण त्यांना खास यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी चित्रपटाती खलनायक शक्ति कपूरसोबत लग्न केले आणि त्या अभिनयापासून दुर गेल्या. दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते.

५ नवाब शहा – ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक पुजा बत्राने बॉलीवूडचे प्रसिद्ध खलनायक नवाब शहासोबत लग्न केले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. नवाब शहा ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध खलनायक आहेत. तर पुजा बत्रा देखील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे.

महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?
‘सुर्यवंशम’ चित्रपटातील अभिनेत्रीचा शेवट होता अत्यंत वाईट; गरोदर असताना झाला मृत्यू
शोलेच्या शुटींग वेळी अमिताभ धर्मेंद्रसोबत बोलायचं दूर त्यांच्याकडे बघतही नव्हते; कारण..
‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.