Share

मुंबईने संघातून काढताच पोलार्डने घेतली निवृत्ती; म्हणाला, काहीही झालं तरी मुंबईविरूद्ध खेळू शकत नाही

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची रिटेन्शन लिस्ट बाहेर येण्यापूर्वीच मोठा दणका बसला आहे. आयपीएलमधील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या किरॉन पोलार्डने या स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली आहे, म्हणजेच तो यापुढे इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. 13 वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळणारा किरॉन पोलार्ड आता संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनला आहे.

किरॉन पोलार्डने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर निवृत्तीशी संबंधित माहिती दिली आहे. किरॉन पोलार्ड म्हणतो की, माझ्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता, पण मुंबई इंडियन्सशी झालेल्या दीर्घ चर्चेनंतर मी यापुढे आयपीएलमध्ये खेळणार नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे. जर मला मुंबई इंडियन्ससोबत खेळता येत नसेल तर मी कोणाशीही खेळणार नाही.

किरॉन पोलार्डने लिहिले की मुंबई इंडियन्सने बरेच काही साध्य केले आहे आणि आता ते बदलाच्या टप्प्यातून जात आहेत. हा भावनिक निरोप नाही कारण मी मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारले आहे. तसेच तो मुंबई एमिरेट्ससोबत खेळताना दिसणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील एक दिग्गज खेळाडू म्हणून किरॉन पोलार्डकडे पाहिले जाते, तो सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सशी संबंधित होता. किरॉन पोलार्डने २०१० मध्ये दिल्ली संघाविरुद्ध पदार्पण केले होते, तर २०२२ मध्ये कोलकाता संघाविरुद्ध शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.

आयपीएलचे रेकॉर्ड पाहता त्याने एकूण 189 आयपीएल सामने खेळले, ज्यामध्ये 16 अर्धशतकांसह 3412 धावा केल्या. पोलार्डच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 223 षटकार आहेत, तर गोलंदाजीतही त्याने कमाल केली आणि एकूण 69 विकेट घेतल्या. यामुळेच आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये कीरॉन पोलार्डची गणना होते.

कधी बॅटने तर कधी चेंडूने आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या किरॉन पोलार्डने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली. मुंबई इंडियन्सकडून खेळताना, किरॉन पोलार्ड 2013, 2015, 2017, 2019, 2020 च्या चॅम्पियन संघाचा भाग होता. तसेच, 2011 आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स लीग जिंकणाऱ्या संघाचा तो एक भाग होता.

महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीला सर्वात मोठा झटका! ‘या’ आमदाराने तडकाफडकी सोडला पक्ष
Ravindra Jadeja : स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाची बायको आणि बहीणीने एकमेकींविरोधात ठोकले शड्डू
uddhav thackeray : धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी कोर्टात गेलेल्या ठाकरेंना न्यायालयाचा दणका

 

ताज्या बातम्या खेळ तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now