“राजकारणानं उद्धवस्त केलं, पाहता क्षणी त्याला मारून टाका”

 

नवी दिल्ली। उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बिकरु गावात ८ पोलिसांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी असणाऱ्या विकास दुबे याचा पोलिस शोध घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर दुबे याच्या आईने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. तो राजकारणामुळे उद्धवस्त झाला आहे. त्याला अनेकांनी पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली होती. आता त्याला पाहता क्षणी मारुन टाका, असे त्या म्हणाल्या आहेत.

“आताच घरी पोलिस येऊन गेले. विकासने काय कृत्य केले हे त्यांनी सांगितले. त्याला मारुन टाका. त्याने दुसऱ्यांची आत्मा दु:खी केली आहे. आता त्यालाही मारुन टाकायला हवं. पण विकास पूर्वी असा नव्हता.

आम्ही त्याला शिक्षणासाठी पीपीएन कॉलेजमध्ये घातलं होतं. त्याला एअरफोर्समध्ये आणि नंतर नेव्हीमध्ये नोकरी लागणार होती. त्याला या गाववाल्यांनी आणि राजकारणाने उद्धवस्त करुन टाकले.

तो सुरुवातीला ५ वर्षे भारतीय जनता पक्षामध्ये होता. कारण हरिकिशन त्या पक्षात होते. नंतर हरिकिशन बहुजन समाज पक्षात(बीएसपी) गेल्यानंतर तोही तिकडे गेला. त्यानंतर तो पाच वर्ष समाजवादी पक्षात(एसपी) होता”, असे विकास दुबे यांच्या आईने सांगितले आहे.

२००० मध्ये कानपूरच्या शिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्येप्रकरणात त्याच्यावर आरोप झाले होते. याचवर्षी रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता.

२००४ मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे याची हत्या झाली होती. यातही विकास दुबेचा हात असल्याचे बोलले जाते. २०१३ मध्ये त्याच्यावर गंभीर आरोप झाले. विकास दुबे याच्या विरोधात आतापर्यंत ६० पेक्षा अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.