कोरोना काळात राजकारण करू नका, नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांना झापले

नागपूर । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर लागत आहे. असे असताना राज्यात राजकारणाला उत आला आहे. विरोधक सत्ताधारी यांच्यात सतत टीका टिप्पणी सुरू आले.

यावर आता भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्त्यांना एक खबरदारीचा सल्ला दिला आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी गडकरी म्हणाले, देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती आहे, योग्य काळजी घ्या. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा.

सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

तसेच, राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाही. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे. नुसते निवडणुका लढवून सत्तेत येणे हा त्याचा अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी कान टोचले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेकांना ऑक्सिजन बेड, रेमडेसीवीर इंजेक्शन देखील मिळत नाहीत. नितीन गडकरींनी इतर राज्यातून देखील मदत गोळा केली आहे.

ताज्या बातम्या

..आणि पोलिसांनी शटर उघडून दुकान चालवणाऱ्या मुलाला लावल्या कानशिलात, पहा व्हिडीओ

२०१५ पासून चीनी संशोधक बनवत होते कोरोना व्हायरस, लीक कागदपत्रांमधून अनेक धक्कादायक खुलासे

ज्या नेत्याने राहुल गांधीच्या कुत्र्यामुळे सोडली होती काँग्रेस, त्याच नेत्याला भाजपने बनवले मुख्यमंत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.