राजकीय योगायोग असाही! सासरे मुख्यमंत्री जावई आमदार, विधिमंडळात दिसणार अनोखे नाते

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. राजकीय जीवनात तसेच वैयक्तिक आयुष्यात देखील याची प्रचिती येते. आता केरळमध्ये यंदा एक वेगळा योगायोग पाहायला मिळणार आहे. सासरे आणि जावई हे दोघेही विधिमंडळात एकत्र दिसणार आहेत.

हे सगळे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याचबाबतीत घडून आले आहे. सासरे विजयन हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्यांचे जावई पी.ए. मोहंमद रियाझ हे देखील आमदारकीची शपथ घेतील. यामुळे हा राजकीय योगायोगच म्हणावा लागेल.

रियाझ हे डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. रियाझ यांनी काही दिवसांपूर्वीच विजयन यांच्या कन्या वीणा यांच्याशी विवाह केला होता. ते मोठे उद्योजक आहेत.

विजयन हे कन्नूर जिल्ह्यातील धरमादम मतदारसंघातून विजयी झाले. रियाझ हे कोझीकोडमधील बेपोर मतदारसंघातून जिंकले आहेत. यामुळे दोघेही आता विधिमंडळात दिसणार आहेत.

रियाझ यांनी २००९ मध्ये कोझीकोड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक देखील लढविली होती पण ते त्यात पराभूत झाले होते. मात्र ते पुन्हा आमदार झाले आहेत. यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द पुढे येत गेली.

यामुळे हा राजकीय योगायोगच म्हणावा लागेल. सासरे मुख्यमंत्री आणि जावई आमदार विधिमंडळात हा अनोखा राजकीय योगायोगच दिसणार आहे. मात्र असे अनेक राजकीय नेते हे राजकीय घरातच नातेसंबंध जोडतात.

ताज्या बातम्या

बेसिनचा एक पाईप बसवण्यासाठी प्लंबरने मागितले तब्बल ४ लाख रुपये; वाचा संपुर्ण किस्सा

अजबंच! दोनचा पाढा म्हणता नाही आला, म्हणून नवरीने भर मंडपातून केली नवरदेवाची हकालपट्टी

…म्हणून विंचवीने मुलांना जन्म दिल्यानंतर काही तासांनी तिचीच पिल्ले तिला खाऊन टाकतात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.