एनसीपी (NCP): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील आमदारांची शिंदे गटात इन्कमिंग सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षातील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच आता पंढरपुरातही राजकीय वादळाला सुरुवात झाली आहे.
नगरपालिकेतील सत्ताधारी एक गट शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता शिंदे गटात सामील होत असल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यासोबत अनेक पदाधिकारीही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीच्या या नेत्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्याचे पडसाद आता तालुका पातळीवरही उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसचे पंढरपूर येथील काही बडे नेते एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथल्या अनेक नेत्यांची भेट घेतली होती. नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष साधना भोसले व त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचा यामध्ये समावेश होता. पंढरपूरमधील शिंदे समर्थकांच्या घरी एका बंद खोलीमध्ये त्यांची सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच नागेश भोसले यांनी अलीकडेच मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचीही चर्चा आहे. राजकीय पर्याय म्हणून अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसेच नेत्यांनी शिंदे गटाला पसंती दिली असल्याची माहिती मिळत आहे. नगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना पंढरपुरात राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
नरेंद्र मोदींनी कधी चहा विकलाच नाही? स्वतः त्यांचा भाऊ प्रल्हाद मोदींनीच केला मोठा खुलासा
Shivsena: ‘मोगलांना सगळीकडे संताजी धनाजी दिसायचे तसे गद्दारांना उद्धवजी आणि आदित्य ठाकरे दिसताहेत’
टोलनाक्यांचा जनक मीच, पण आता…; टोल संदर्भात नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा
..म्हणून मी मंगळसुत्र गळ्यात न घालता हातात घालते; अमृता फडणवीसांनी सांगीतले अजब लाॅजीक