Abdul Sattar : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन नवीन सरकार स्थापन केले. हे सरकार स्थापन होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. पण सरकार आणखी ही स्थिर स्थावर झालेले नाही. शिंदे गट आणि भाजपाच्या या सरकारमध्ये समन्वयाचा आभाव आहे.
यामुळेच अनेक निर्णयात तफावत दिसून येते तर काही वेळा सरकारमधले मंत्रीच एकमेकांना भांडताना दिसतात. शिंदे सरकारचा संपूर्ण कारभार सध्या अवघे १८ मंत्री पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यावर कामाचा लोड वाढलेला आहे. तर अनेकांना मंत्रीमंडळ विस्तारत मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे.
त्यामुळे ही या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात कुरबुऱ्या सुरु आहेत. आता एक नवीन वाद समोर आला आहे. हा वाद दुसरा कोणी नाही तर एकनाथ शिंदे यांचे विश्वासपात्र मंत्री अब्दुल सत्तार यांनीच घातला आहे. अब्दुल सत्तारांनी मुख्यामंत्र्यासमोरच त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ केला आहे.
हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्याच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर घडला. एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकारानंतर अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण अब्दुल सत्तार रागाच्या भरात बैठक सोडून निघून गेले. त्यानंतर त्यांनी असे काही विधान केले की सगळीकडेच चर्चेला उधाण आले आहे.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे जर देशाचे पंतप्रधान झाले तर चांगली गोष्ठ आहे. मराठी माणूस जर पंतप्रधान होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आता त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर पुढे काय होते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सत्तार नाराज आहेत की त्यांनी चर्चेत राहण्यासाठी हे विधान केले हे काही दिवसात कळेल.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: सासरी जाण्याआधी नवरीने एक्स-बॉयफ्रेंडसाठी रडत रडत गायले गाणे, नवरदेवही झाला शॉक
Rekha : रेखाच्या भांगेतल सिंदूर पाहून जया बच्चनने रेखाच्या कानाखाली वाजवली होती; वाचा पुर्ण किस्सा..
Rekha: नेहमी रेखासोबत सावलीसारखी असणारी आणि अमिताभसारखी दिसणारी ही महिला कोण?






