PSI सह पाच पोलिस निलंबित; निरपराध व्यक्तीला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाई

जालना । जालन्यात एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. पोलिसांनी केलेली मारहाणी आता त्यांना चांगलीच अंगलट आली आहे. एका भाजप कार्यकर्त्याला त्यांनी अमानुष मारहाण केली होती. हे प्रकरण तापले असता अखेर पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी भाजपच्या सुवा सरचिटणीस शिवराज नरियलवाले याला पोलिसांनी दांडके तुटेपर्यंत मारहाण केली होती. याचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर टीका होऊ लागली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली आहे.

याबाबत PSI भगवत कदम, पोलीस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळुंखे आणि महेंद्र भारसाकळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र मारहाण करणारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे निलंबन कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

जालना येथील जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना ९ एप्रिल रोजी जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शिवराज नारियलवाले दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते.

त्याच सुमारास गवळी समाजाच्या एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक धुडगूस घालत होते. त्यावेळी काही पोलीस हे गवळी समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करत होते. शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिवीगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली.

यामुळे त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली, असेही देवेंद्र फडणवीसांनी पत्रात म्हटले आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी देखील कारवाईची मागणी केली होती.

ताज्या बातम्या

मल्लिका दिसली स्विमिंगपुलमध्ये बिकीनीवर अंघोळ करताना; व्हिडिओ पाहून चाहते पण झाले घायाळ, पहा व्हिडिओ

या आजोबांच कोरोनासुद्धा काही वाकडं करू शकत नाही; व्हिडीओ पाहून पोटं धरून हसाल

वडील सावत्र आईचं नाव काढत नाही; तर दुसरीकडे नातू कौतूक करता करता थांबत नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.