रक्षकच झाला राक्षस! विधवेवर बलात्कार प्रकरणी फरार पोलिस निरीक्षकावर गुन्हा

मुंबई : विधवेशी लग्न करून तिचे शारीरिक शोषण केल्यानंतर फरार झालेल्या पोलीस निरीक्षक अरविंद भोळेविरुद्ध अखेर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या भोळेला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी रविवारी निलंबित केले.

भोळे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विधवेशी लग्न करून शारीरिक शोषण केल्याने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ते पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर होते.

तसेच दुसरी घटना मानकापूर पोलीस ठाण्यातील आहे. जखमी वृद्ध रस्त्यावर पडून असतांना घटनास्थळावर न पोहचणे त्यानंतर त्या वृद्धाचा मृत्यू होणे त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी चौघांचे निलंबन करण्यात आले त्यात एक पोलीस उपनिरीक्षक आहे.

दरम्यान, तिसरी घटना यशोधरा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व उप पोलीस निरीक्षक यांनी आत्महत्येच्या प्रकरणात उकळलेले खंडणी त्यामुळे एका उप निरीक्षकाला अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात सहा पोलिसांचे निलंबन करण्यात आले असून त्यात दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

संतापजनक! तहानलेला मुस्लिम मुलगा मंदिरात आला, पाणी नाही पण लाथा-बुक्क्यांचा मार दिला

धडाकेबाज खेळी करणाऱ्या इशान किशनचे विराटने केले कौतुक, म्हणाला…

अक्षयने दिलेला ‘हा’ सल्ला राजेश खन्नांनी ऐकला; ज्यामुळे त्यांना मिळाले आयुष्यभर गमावलेले सुख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.