हुंड्यासाठी पत्नीला बेदम मारहाण, अखेर त्रासाला कंटाळून पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

तिरुअनंतपुरम। २१ व्या शतकात पुर्वीपेक्षा काळानुसार प्रचंड बदल झाल्याचे आपण पाहत आहोत. अनेक गोष्टींमध्ये झपाट्याने बदलत गेल्या आहेत. मात्र जरी आपला देश विकसनशील असला तरी आपल्या आजूबाजूला अजूनही काही गैर गोष्टी सुरू असल्याचे आपण पाहत असतो.

त्याचंच एक उदाहरण म्हणजे लग्नातील हुंडा पध्दत. आपल्या देशात हुंडा पध्दतीला बंदी असली तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही हुंडा पध्दत सुरू असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. व यामुळे अनेकांचे संसार उध्दस्त झाल्याचे आपण पाहिले आहे. अशातच केरळातील कोलम जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

सोनं, जमीन जुमला, आलिशान गाडी यासारख्या ‘भेटवस्तू’ लग्नात देऊनही मन न भरल्यामुळे पोलिसाकडून नवविवाहितेचा छळ सुरुच होता. शारीरिक अत्याचारांमुळे आपल्या शरीरावर झालेल्या जखमांचे फोटो वडिलांना पाठवत अखेर तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मार्च 2021 मध्ये केरळ मोटर वाहन विभागात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या किरणकुमारशी विस्मया नायर या तरुणीचा विवाह झाला. त्यांच्याच हुंडा पध्दत असल्याने लग्नात किरणकुमार याला गाडी भेट देण्यात आली होती, मात्र गाडी किरणकुमारला आवडली नव्हती.

त्यामुळे आणखी चांगली गाडी किंवा दहा लाख रुपयांची रोकड द्यावी, अशी मागणी तो विस्मयाच्या माहेरच्या माणसांकडे करत होता. हुंड्यापायी त्याने नवविवाहित पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र विस्मयाच्या वडिलांनी हे आम्हाला जमणार नसल्याचं सांगितलं.

त्यानंतर नवऱ्याचा त्रास इतका वाढला, की लग्नानंतर काही दिवसातच ती माहेरी येऊन आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागली. मात्र किरण कुमार मध्यरात्री आमच्या घरी येऊन डोळ्यादेखतच विस्मयाला मारहाण केली” असा आरोप तिचे वडील त्रिविक्रम नायर यांनी केला आहे.

किरण कुमारविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र तडजोडीनंतर ती मागे घेण्याची तयारी नायर कुटुंबाने दर्शवली होती. त्यानंतर किरणने तिला विस्मयाल घरी येण्याची विनंती केली. विस्मया बीएएमसच्या अखेरच्या वर्षाला शिकत होती. नंतर किरणने पुन्हा तिचा गाडीसाठी छळ सुरु केला.

इतकंच नाही, तर तिला पालकांशी बोलण्यासही बंदी केली. विस्मयाने परीक्षा देऊ नये, अशी त्याची इच्छा होती. त्याने तिच्या फी भरण्यासही इन्कार केला. त्यामुळे विस्मयाला आपल्या आईकडे पैशांची मागणी करावी लागली. त्यानंतर तिने कंटाळून अखेर रविवारी रात्री आपल्या बहिणीकडे व्हॉट्सअॅप मेसेज करुन आपली बिकट स्थिती कथन केली.

व शिवीगाळ करुन पती किरण कुमार आपल्यावर शारीरिक अत्याचार करत आहे, असा आरोपही तिने मेसेजमध्ये केला होता. त्यामुळे शरीरावर झालेल्या जखमांचे फोटोही तिने पाठवले. व सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात आलं.

मात्र नायर कुटुंबीय हॉस्पिटलला पोहोचताच विस्मयाने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. विस्मयाच्या वडिलांनी मात्र ही आत्महत्या नसून किरणकुमारनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप लावला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी किरण कुमारला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

महत्वाच्या बातम्या
‘एलियन्स पृथ्वीवरच्या पुरुषांपेक्षा खूप चांगले असतात’ तरुणी पडली चक्क एलियन्सच्या प्रेमात 
VIDEO: नदीत पिकनिक पडली भारी, कुटुंब अडकले पुरात, पुढे जे झाल तुम्हीच पहा
मुलांना सांभाळणारी महिला कर्मचारीच बनली भक्षक; अल्पवयीन मुलांचे करत होती लैंगिक शोषण
लग्न झाले मात्र ‘या’ कारणामुळे नवरी सासरी गेली नाही, अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.