‘जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील’ असे म्हणत बंदुक घेऊन काढला व्हिडीओ, पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन

अमरावती । अमरावतीमध्ये एक पोलीस कर्मचारी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेश मुरलीधर काळे यांनी पोलिसांच्या गणवेशात हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडिओ बनवणे चांगलेच महागात पडले आहे.

यानंतर पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबनाची केले आहे. त्यांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. महेश काळे यांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या हातामध्ये रिव्हॉलवर होता तर ते पोलिसाच्या गणवेशात होते. यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

यामध्ये त्यांनी म्हटले होते, अमरावती जिल्ह्यात पाय ठेवताना दादागिरी आणि भाईगिरी १० किमी लांबच ठेऊन यायचे. जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील. कारण कसं आहे, का कायद्याचा बालेकिल्ला म्हणजेच अमरावती जिल्हा. त्यांचा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता.

आता मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. व्हिडिओ अनेकांनी बघितल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती. पोलीस कर्मचारी महेश काळे हे आपल्या शासकीय गणवेशाचा आणि रिव्हॉलवरचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

यामुळे याची दखल अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. एन. हरिबालाजी यांनी दखल घेतली. यानंतर महेश काळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. यामुळे असा व्हिडिओ बनवणे त्यांच्या चांलगेच अंगलट आले आहे.

ताज्या बातम्या

खतरनाक! घरात घुसली ८ फुटांची मगर, मगरीला पाहून घरातील कुटुंबियांची उडाली तारांबळ, पहा व्हिडिओ

‘तारक मेहता…’मधील सोनूचा विचित्र अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले “तू डिस्नेला जायला हवं”

‘लग्नानंतरही हनी सिंगचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध…’ बायकोने केले खबळजनक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.