काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे(Raj Thakare) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. ४ तारखेनंतर जिथे जिथे अजान होणार तिथे तिथे दुप्पट आवाजात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असं विधान राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलं.(Police will take strong action against Raj Thackeray, clear indication of Home Minister)
यानंतर राज्यातील गृहखातं ऍक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये काही प्रक्षोभक बाबी आढळल्यास त्यांच्यावर गृहविभागाकडून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर मत व्यक्त केलं आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे यांनी राज्यातील जनतेला कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. तसेच औरंगाबाद येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर संवेदनशील भागासाठी विशेष सूचना करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत प्रक्षोभक भाषण केले. या भाषणामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो”, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये कोणत्या प्रक्षोभक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे का? याचा अभ्यास औरंगाबादचे पोलीस आयुक्त करत आहेत. यासंदर्भातील अहवाल तयार झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची का नाही? यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
राज ठाकरे यांना औरंगाबाद येथील सभेसाठी काही नियम आणि अटी पोलीस विभागाकडून देण्यात आल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेत या अटींचा भंग केला असल्याचे सांगितले जात आहे. यावर देखील राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्तांचा निर्णय आल्यानंतर राज ठाकरे यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे नंतर मशिदींवरील भोंगे न हटवले नाहीत, तर मशिदींसमोर डबल आवाजामध्ये हनुमान चालिसा लावू असे सांगितले आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. महाराष्ट्रातील पोलीस दल कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सक्षम आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘अंगात छत्रपती शिवाजी महाराज आले पाहीजे; हीच खरी मराठेशाही ठरेल’
“मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गळ्यात हिरवा साप बांधण्यापेक्षा भगवी शाल महत्वाची”
राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लिम समाज आक्रमक; इम्तियाज जलील यांनी केले ‘हे’ मोठे विधान