अहमदनगरच्या पोलिस अधिकाऱ्याने अभिनेत्रीकडे केली ‘ही’ विचित्र मागणी, मागणी पाहून अभिनेत्री संतापली

अभिनेता असो वा अभिनेत्री सतत चर्चेत राहण्यासाठी ते सोशल मीडियावर काही ना पोस्ट करत असतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक गोष्टींवर व्यक्तही होत असतात. अनेकदा सोशल मीडियावर अभिनेत्रींनी बोल्ड फोटो टाकले तर त्यामध्ये काहीजण वाईट कमेंटही करतात.

आता एका पोलिस अधिकाऱ्यानेच अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करुन एक विचित्र मागणी केली आहे. ही कमेंट पाहून त्या अभिनेत्रीलाही धक्का बसला आहे. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करुन दिली आहे.

टीव्ही मालिकेतील अभिनेत्री शिखा सिंहकडे एका पोलिस अधिकाऱ्याने धक्कादायक मागणी केली आहे. २०१८ साली शिखाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, त्या पोस्टवर एका पोलिस अधिकाऱ्याने तिच्याकडे चक्क बिकीनी फोटोची मागणी केली होती.

शिखाने एक पोस्ट शेअर केली होती, त्यामध्ये एका जगदिश गुंजे नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने बिकीनी फोटोची मागणी केली होती. सुंदर फोटो. पण नव्या वर्षासाठी भेटवस्तू म्हणून काही बिकीनी आणि मायक्रो बिकीनीमधील फोटो पोस्ट कर, अशी कमेंट पोलिस अधिकाऱ्याने केली होती.

ही कमेंट पाहून शिखा चांगलीच संतापली. पण जेव्हा तिला कळाले की ही कमेंट एका पोलिस अधिकाऱ्याने केली आहे, तेव्हा ती खुपच संतापली आणि तिने या कमेंटचा फोटो पोस्ट केला. तसेच त्या पोलिस अधिकाऱ्याच्या अकाऊंटचे फोटोही पोस्ट केले.

२०१८ सालची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खुपच व्हायरल होत आहे. आई झाल्यापासून शिखा सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह आहे. ती तिच्या बाळासोबतचे अनेक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.

महत्वाच्या बातम्या-

या सासूने समाजासमोर नवा आदर्श केला उभा, आपल्या सूनांना गौराई बनवून केली तीन दिवस पूजा
‘सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो, आरोपाने राज्यात खळबळ
कुत्र्यांना खाऊ घालत होते चिमुकले, अचानक इमारत कोसळली अन् आईसमोरच गेला दोन्ही मुलांचा जीव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.