पोलिसांच्या नावाला काळिमा! बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळल्यानंतर तरुण-तरुणीला अर्धनग्न अवस्थेतच नेले ठाण्यात

मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या नावाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. रीवा जिल्ह्याच्या शाहापुर हद्दीच्या पोलिसांनी बसमध्ये एका प्रेम युगुलाला आक्षेपार्ह स्थितीत पकडले आहे आणि त्यांना तसेच अर्धनग्न अवस्थेत पोलिस ठाण्यात नेले आहे.

पोलिसांनी जेव्हा त्या कपलवर कारवाई केली, तेव्हा एकही महिला पोलिस त्यांच्यासोबत नव्हती. पोलिसांनी त्या प्रेम युगुलाला आधी शिवीगाळ केली आणि तरुणीला अर्धनग्न अवस्थेतच पोलिस ठाण्यात नेले आहे.

तसेच संबंधित घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पोलिसांचे संतापजनक कृत्य दिसून येत आहे. ज्या प्रकाराने पोलिसांनी तरुणीसोबत वागणुक केली आहे, त्यामुळे देशभरातून रिवा पोलिसांवर टीका केली जात आहे.

आता या प्रकरणी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका बसमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. याची माहिती नागरीकांनी तिथल्या स्थानिक पोलिसांनी दिली. ते लगेच घटनास्थळ पोहचले.

पोलिसांसोबत तेव्हा एकही महिला कर्मचारी नव्हती. तिथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला. इतकेच नाही, तर तरुणीला त्याच अवस्थेत पोलिसांनी पोलिस ठाण्यात नेले आहे. पोलिसांच्या अशा वागण्यामुळेच सर्व स्तरातुन त्यांच्यावर टीका केली जात आहे.

ASP मऊगंज विजय डाबर यांच्या म्हणण्यानुसार, पीडित तरुणी रिवापासून हनुमनाला जाणाऱ्या बसमध्ये बसली होती. रात्र झाल्यामुळे तरुणी आपल्या प्रियकरासोबत थांबली. तेव्हा प्रियकर आणि तरुणी दोघेही बसमध्ये झोपी गेले. अशातच बसच्या एका स्टाफ मेंबरने याबातची माहिती पोलिसांना दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! रोबो आपापसात संबंध ठेवून मूल जन्माला घालणार, जाणून घ्या..
VIDEO: रियल हिरो सोनू सूद करतोय साकलवरून ब्रेड, अंड्यांची होम डिलिव्हरी
ब्रेकिंग! साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, ‘या’ आमदाराची झाली निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.