त्या व्हिडीओतून बाबांच्या खात्यात आले तब्बल ४० लाख; पण पुढे त्यावरूनच झाले असे वाद की..

दिल्ली | बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद आणि त्यांना प्रसिद्ध करणारा युट्युबर गौरव वासन यांच्यातील वाद आता थेट पोलिसांकडे पोहोचला आहे. बाबा आता लखपती झाले आहेत त्यांच्या खात्यात आता ४० लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे आले आहेत.

गौरव वासन याने स्वतः बाबांचे बँक अकाऊंट सोशल मीडियावर शेअर केले होते. आणि एकीकडे बाबा म्हणत होते की, त्यांना माहीतच नाही माझ्या खात्यावर किती पैसे आले आहेत. बाबांनी आता नवीन घर घेतले आहे आणि आता बाबा नवीन ढाबा खोलनार आहेत.

ढाब्यासाठी त्यांनी जागाही बघितली आहे. दक्षिण जिल्ह्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गौरव वासन याने पहिल्यांदा स्वतःच्या बँक अकाऊंटचा नंबर सोशल मीडियावर शेअर केला होता.

त्यानंतर त्याच्या खात्यावर जवळपास ४ लाख रुपये जमा झाले होते. त्यानंतर गौरव वासन याने २ लाखांपेक्षा जास्त पैसे बाबांच्या खात्यावर जमा केले. अजूनही ३० ते ४० हजार रुपये त्याच्या खात्यावर आहेत.

ही गोष्ट पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. गौरव वासन याने फक्त स्वतःचे अकाऊंट शेअर केले।होते बाकी त्याच्यामध्ये त्याची पत्नी किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश नव्हता.

गौरवने काही काळानंतर बाबांचे अकाऊंट सोशल मीडियावर शेअर केले होते. बाबांच्या खात्यात एकूण ४० लाख रुपये आले आहेत. पोलिसांनी याची चौकशी केली आहे. पोलीस एक दोन दिवसांत गौरवला चौकशीसाठी बोलावणार आहेत.

त्याला विचारले जाईल की, सुरुवातीला बाबांचे अकाऊंट का शेअर केले नाही? आणि त्याच्या अकाऊंटमध्ये जे बाबांचे पैसे आहेत ते त्याने परत का केले नाही? सध्या बाबा आणि गौरव या दोघांचे अकाऊंट सील करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.