Share

Shivsena : शिवसेना-शिंदे गट वादाला नवे वळण, पोलिसांनी सरवणकरांचे पिस्तूल जप्त करत केली मोठी कारवाई

Sada Sarvankar

Shivsena : नुकतीच शिवसेना आणि शिंदे गटातील गणपती विसर्जनाच्या वेळी झालेल्या वादाची बातमी समोर आली होती. हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. या वादाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी सदा सरवणकर यांचे पिस्तूल जप्त केले आहे.

प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जनाच्या दिवशी शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. त्यावेळी पोलिसांनी हा वाद शांत केला. परंतु, त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा प्रभादेवी परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये हाणामारी झाली.

यावेळी शिवसेनेकडून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला होता. दादर पोलीस स्टेशन परिसरात आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खाजगी पिस्तुलातून गोळीबार केला, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. परंतु, सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले.

मात्र, आता सदा सरवणकरांचे पिस्तूल दादर पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी त्यांचे हे पिस्तूल जप्त केले आहे. शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सदा सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याद्वारे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी शिंदे गटाचे नेते संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे शिवसेनेतील पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर आता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

यासोबतच शिंदे गटातील सदा सरवणकर, समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सदा सरवणकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तसेच या सर्व घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या
Devendra Fadanvis : अब्दुल सत्तारांचा उतावीळपणा पाहून फडणवीसांनी त्यांना मंत्रिमंडळ बैठकीत झापलं, म्हणाले, “परस्पर..
Navneet Rana : लव्ह जिहाद प्रकरण नवनीत राणांच्या अंगलट, थेट पोलिसांत गेली तक्रार, वाचा तक्रारीत काय म्हटलंय?
VIDEO : Amisha Patel : वयाच्या ४६ व्या वर्षीही अमिषा पटेलने ओलांडल्या सर्व मर्यादा, टू पिस घालून व्हिडीओ केला शेअर
Uttar Pradesh : मेहुणीसोबत मिळून दाजी बाईकवर बसून करायचा ‘असं’ काम, सीसीटीव्ही पाहून पोलिसही हैराण

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now