वर्दीला सलाम! धावत्या ट्रेनमध्ये जीव धोक्यात घालत पोलिसाने वाचवला लटकलेल्या प्रवाशाचा जीव; पहा थरारक व्हिडीओ

रेल्वेत पॉईंटमन म्हणून काम करणाऱ्या मयुर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचा जीव वाचवला होता. हा सर्व थरारक प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला होता. त्यानंतर मयुर शेळके यांचे सर्वत्र कौतूक करण्यात आले होते.

आता असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिक रोड स्टेशनवरुन धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्ध माणसाचा जीव पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वाचवला आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

नाशिक रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उत्तर प्रदेशहून आलेली गोदान एक्सप्रेस मुंबईला जात होती. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर काही वेळ थांबली आणि त्यानंतर ती रेल्वे पुन्हा निघाली आणि वेग पकडला.

अशात एका प्रवाशाला या रेल्वेत बसायचे होते. त्यामुळे रेल्वेला जाताना बघून त्याने रेल्वेकडे धाव घेतली. बोगीत चढत असतानाच त्याचा पाय सटकला आणि तो धावत्या रेल्वेला लटकला.

हा प्रवासी फलाट आणि रेल्वे बोगीच्या पायरीच्यामध्ये अडकला होता. अशा अवस्थेत घसरत असल्याचे त्या स्थानकावर बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी इमरान कुरेशी आणि राकेश शेडमाके यांच्या लक्षात आले.

त्या दोघांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ धावून त्या प्रवाशाच्या कमरेचा बेल्ट पकडून त्याचा जीव वाचवला आहे. त्यानंतर त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ती गोदान एक्सप्रेस थांबवली आणि त्या प्रवाशाला सुखरुप बसवून दिले. एका प्रवाशाचा जीव वाचल्याने त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतूक केले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

स्विफ्ट, डिझायर, वॅगनआर मिळवा फक्त दोन लाखांत; मारूती सुझुकी कंपनीने दिला स्वस्त पर्याय
देशातील असं एक गाव जिथे एकही कोरोना रुग्ण सापडला नाही; कारण वाचून चकीत व्हाल
पोत्यांची थापी रचल्यासारखे २२ मृतदेह एकाच रुग्णवाहीकेत कोंबले; बीडमधील हादरवून टाकणारी घटना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.