अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या घरी पोहोचले पोलिस; ‘या’ कारणासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू

मुंबई । सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे त्याच्या पत्नीने त्याच्या कुटुंबावर अनेक आरोप करून एफआयआर दाखल केला आहे.

नवाजच्या पत्नीने आलियाने नवाजसह त्याच्या तीन भावांवर आणि त्याच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये तिने नवाजच्या भावावर लैंगिक शोषण आणि मारपीट केल्याचे म्हटले आहे.

कुटुंबीयांविरोधात आलियाने मानसिक व शारीरिक शोषणाचे आरोप केले. यावेळी नवाज हा मुंबईत होता, आलिया नवाजला भेटायला मुंबई देखील आली होती.

घडलेल्या प्रकाराबद्दल आलियाने नवाजला ही माहिती दिली. तेव्हा त्याने ह्या गोष्टीचा माझ्या करिअरवर परिणाम होईल. हे प्रकरण घरीच मिटवू असे त्याने सांगितले, असेही आलिया म्हणाली.

या प्रकरणी नवाजच्या भावांनी आणि आईने मला धमकी दिली असेही आलिया म्हणाली. यामुळे आता नवाजुद्दीनची देखील चौकशी करण्यात येत आहे. त्याच्यावर देखील अनेक आरोप आलियाने केले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.