Pune : पुण्यातील बाणेर परिसरातील एका नामांकित स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘वेदा स्पा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई केली. यावेळी काही महिला व युवतींची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटर चालवणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
बाणेरच्या बालेवाडी फाटा परिसरात असलेल्या या स्पा सेंटरविषयी पुणे पोलिसांना काही दिवसांपासून गुप्त माहिती मिळत होती. मसाजच्या नावाखाली येथे देहविक्री होत असल्याचे स्पष्ट संकेत पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. खात्रीशीर माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकत हा अवैध प्रकार उघडकीस आणला.
महिलांची सुटका, संचालकांविरोधात गुन्हा
छाप्यादरम्यान पोलिसांनी चार ते पाच महिलांची सुटका केली असून, त्या देशातील विविध भागांतून येथे कामासाठी आणल्या गेल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी स्पा सेंटरचा संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात पिटा कायद्यांतर्गत (Prevention of Immoral Traffic Act) गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
देहविक्रीतून आर्थिक लाभ; ग्राहकांवरही चौकशी
प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, ग्राहकांकडून मसाजसाठी मोठ्या रकमेची मागणी करून त्यातून देहविक्रीचा व्यवहार केला जात होता. यामध्ये ऑनलाइन अॅप्स आणि सोशल मीडियाचा वापर करण्यात येत होता. पोलिसांकडून या प्रकरणातील ग्राहकांचीही चौकशी केली जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचा इशारा : अशा स्पा केंद्रांवर कारवाई सुरूच राहील
या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी शहरातील इतर स्पा आणि मसाज पार्लरवर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. “मसाजच्या नावाखाली अवैध धंदा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. तसेच, नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना त्वरित देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
police-raid-a-large-massage-parlor-in-baner-pune