पाहूणे म्हणून लग्नाला आले, अन् बेडूक उड्या मारत गेले; लग्नाला गर्दी करणाऱ्यांना पोलिसांनी दिली शिक्षा

भिंड | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. प्रशासनाने कोरोना नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना काळात लग्न समारंभ, अंत्यसंस्कार मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी नियमांच पालन होताना दिसून येत आहे. मात्र गावाखेड्यामध्ये कोरोना नियम पायदळी तुडवले जात असल्याचं दिसत आहे.

कोरोना नियम तोडणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिस काठीने चोप देत आहेत. मात्र उत्तर प्रदेशमधील भिंड जिल्ह्यातील पोलिसांनी लग्न समारंभात गर्दी करणाऱ्या वऱ्हाडींना बेडूक उड्या मारण्याची शिक्षा  दिली आहे.

उमरी येथे लग्न सोहळ्याला मोठ्या संख्येत लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तात्काळ विवाह सोहळ्याच्या ठिकाणी कारवाई करण्यास निघाले. त्यांना रस्त्यात एका ट्रॅक्टरमध्ये वऱ्हाडी मंडळी लग्न सोहळा उरकून घराच्या दिशेने जात असल्याचं दिसून आलं.

पोलिसांनी ट्रॅक्टरला थांबवून पाहणी केली असता वऱ्हाडींच्या तोंडाला मास्क लावलेला नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचे तर तीन तेरा वाजले होते. पोलिस अधिकाऱ्याने सर्वांना खाली उतरवले. यामध्ये लहान मुले, तरूण, वयस्कर व्यक्ती होते.

पोलिसांनी सर्वांना एका रांगेत बेडूक उड्या मारण्याची शिक्षा दिली. तसेच बेडूक उड्या न मारणाऱ्यांना काठीने चोपही दिला आहे. सोशल मिडियावर सध्या या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं चित्र दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहीतीनुसार गेल्या २४ तासात २ लाख ७६ हजार ७० नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात ३ हजार ८७४ रुग्णांनी जीव गमावले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
तीन वर्षात सलग तिसऱ्यांदा आई बनतीये बॉलीवूड अभिनेत्री; लोक म्हणाले, आत्ता तरी…
संतापजनक! लस घ्यायला घराबाहेर पडलेल्या लोकांची पोलिसांकडून लूटमार, अडवून फाडली पावती
‘या’ गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लहान मुलासारखे रडत होते मोहम्मद रफी, कारण वाचून डोळे पाणावतील

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.