माणुसकीला काळीमा! हेल्मेट नव्हते म्हणून पतीला शिक्षा, गर्भवती पत्नीला ३ किमी चालावे लागले

ओडिसाच्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. कारण त्या अधिकाऱ्याने एका आदिवासी समुदायाच्या गरोदर महिलेसोबत माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. त्या महिला पोलिस अधिकाऱ्यामुळे त्या गरोदर महिलेला भर ऊन्हात ३ किलोमीटर चालण्याची वेळ आली.

यासाठी ती महिला पोलिस अधिकारी जबाबदार आहे असे बोलले जात आहे. तर झाले असे होते की मयूरभंज जिल्ह्यातील सराट पोलिस स्टेशन अंतर्गत मटकामी साही गावातून बिक्रम बिरूली नावाचा व्यक्ती आपल्या ८ महिन्याच्या पत्नीला घेऊन बाईकवरून हॉस्पिटलमध्ये चालला होता.

रस्त्यात चेकिंगच्या दरम्यान पोलिसांनी त्याला रोखले. यावेळी पोलिस अधिकारी रिना बक्सल त्याच ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी बिक्रमने हेल्मेट नव्हते घातले त्यामुळे त्याला पोलिसांनी दंड भरण्यास सांगितला.

यावेळी बिक्रम म्हणाला की, माझ्याजवळ पुरेसे पैसै नाहीत आणि जेवढे पैसै आहेत तेवढे पैसै माझ्या पत्नीला दवाखान्यात लागणार आहेत. आता चालान कापल्यानंतर नंतर आरटीओमध्ये येऊन जमा करतो असे तो म्हणाला. पण महिला पोलिस अधिकारी रिना हे त्याचे एकायला तयार नव्हत्या.

त्यांनी त्या व्यक्तीला गाडीत टाकले आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. या सगळ्यात बिक्रमची गरोदर पत्नी बराचवेळ त्याच ठिकाणी उभी होती. तिने खुप वेळ वाट पाहिली आणि थेट पोलिस स्थानकात जाण्याचा निर्णय घेतला.

नाईलाजाने तिला पायपीटी करत पोलिस स्टेशन गाठावे लागले. इतकं घडलं तरी त्या पोलिसांनी तिची व्यथा समजून घेतली नाही. भर उन्हात त्या महिलेला ३ किलोमीटर चालावं लागलं. बिक्रमने सांगितले की, मी पत्नीला गाडीत घेऊन चला असे पोलिसांना सांगितले पण त्यांनी माझे एकले ऐकले नाही.

मला तिला एकटीला सोडून मला यावं लागलं. त्याच्याकडे गाडीचे सगळे कागदपत्रे होती. फक्त हेल्मेट नव्हते, अशी माहिती बिक्रमने दिली. या प्रकारानंतर एसपीसह ओआयसी रिना बक्सल यांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेने अनेक ठिकाणांहून पोलिस यंत्रणेवर संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
राज्यातील परिस्थिती पाहून लॉकडाऊन हाच एक पर्याय; राजेश टोपेंचे मोठे विधान
“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”
रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीवर वळूचा हल्ला, वळूने १० फुट हवेत फेकलं आणि…, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.