धांगडधिंगा अंगलट! जंगी मिरवणूक काढणाऱ्या गुं.ड गजा मारणेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे | टोळीयुध्दातून विरोधी गटातील दोघांचा खू.न केल्याप्रकरणी गेल्या सहा वर्षापासून मुंबईतील तळोजा जेलमध्ये असलेला कुख्यात गुं.ड गजानन मारणे उर्फ गजा मारणे याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. त्याच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुणे तब्बल दिडशे किलोमीटर गाड्यांची रॅली काढली. याबाबत गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांवर पोलिसांनी गु.न्हा दाखल केला आहे.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खू. न प्रकरणात गेल्या ६ वर्षांपासून गजा मारणे तुरूंगात होता. त्याची द.हशत इतकी होती की त्याच्याविरोधात बोलायलाही कोणी समोर येत नव्हतं. अखेर त्याची निर्दोष सुटका झाली आणि तो जेलबाहेर आला. गजा मारणे सुटणार असं समजताच त्याच्या समर्थकांनी थेट मुंबईतील तळोजा जेल गाठलं. गजा बाहेर येताच त्याच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष केला.

मुंबई-पुणे हायवेवर गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांनी धुडगूस घातला. शेकडो गाड्यांचा ताफा, मोठमोठ्याने गजा मारणेच्या नावाने घोषणा देत त्यांचा ताफा पुण्याजवळील उर्से टोलनाक्यावर पोहोचला. शेकडो गाड्यांनी टोल न भरताच तसाच  ताफा गजा मारणे राहत असलेल्या पौडमध्ये आला. तिथेही गजा मारणेची जंगी मिरवणूक काढण्यात आली.

गजा मारणेच्या रॅलीचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच या गुंडांना पोलिसांचं भयचं उरलं नसल्याचं बोललं जात होतं. पोलिस याच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांच लक्ष लागलं होत. अखेर पोलिसांनी गजा मारणे व त्याच्या समर्थकांवर बेकायदा जमाव जमवणे, कोरोना नियमाचे उल्लंघन करणे, दहशत निर्माण करणे यांसारख्या कायद्यान्वये गु.न्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी गजा मारणे व त्याच्या काही साथीदारांना अटक केली आहे. रॅलीतील इतर १५० ते २०० समर्थकांना लवकर अटक करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार? मोहन भागवतांनी घेतली मिथुन चक्रवर्ती यांची भेट
..म्हणून रिक्षाचालकाने परत केले चाळीस लाखांचे दागिने; किस्सा वाचून तुम्हाला कौतुक वाटेल
शाब्बास रे पठ्ठया! थंडपेयाची चढ्या दराने विक्री करणाऱ्या हॉटेलला तरूणाने घडवली अद्दल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.