“देवेंद्र फडणवीसांना पोलिस गुप्त माहिती पुरवतात”- संजय राऊत

मुंबई | मनसुख हिरेन प्रकरणी विरोधी पक्षाने विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला होता. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धारेवर धरले होते. त्यांनी हिरेन प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

यावरून सामनाच्या रोखठोक सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

“पोलिसांच्या तपासावर फडणवीस शंका उपस्थित करतात. पोलिसांवर दबाव आणतात, आणि याचतूनच पोलिस विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवतात. सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत”. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमचं विरोधी पक्षनेता म्हणून सुर सापडला. फडणवीस यांनी शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला आणि यातील गोष्टी समोर आणल्या. एखाद्या वकिलाप्रमाणे संपुर्ण केस विधानसभेत मांडली.

दरम्यान हिरेन यांचा खून झाला आहे, असं सांगून विरोधी पक्षाने सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याचा बळी मिळवला आहे. अन्वय नाईक आणि मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विरोधी पक्ष काहीच बोलत नाही. असा सवालही त्यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही चौकशी करा
महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, भाजपनेच मुकेश अंबानी यांच्या घरासमोर कारमध्ये स्फोटके ठेवून हे प्रकरण घडवून आणले. पटोले यांच्याकडे पुरावे असतील तर ‘एटीएसने’ त्यांचीही चौकशी करावी. असंही राऊत यांनी म्हटलं आहे
महत्वाच्या बातम्या-
अखेर सचिन वाझे गजाआड, १३ तासांच्या चौकशीनंतर NIA ने ठोकल्या बेड्या
दाभोळकर आणि पानसरेंच्या प्रकरणावरून हायकोर्टाने तपास यंत्रणांना खडसावले, म्हणाले…
रिक्षाचालकाच्या लावणीने सेलिब्रिटींना घातली भुरळ, आता मिळतेय चित्रपटात काम करण्याची संधी
वाझे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; ‘सचिन वाझे यांना अडकवलं जातंय’ 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.