ठाकरे सरकारला झटका! आणखी एक बडा पोलिस अधिकारी राज्य सरकारविरोधात हायकोर्टात जाणार

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेंना प्रत्येक महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते. असा खळबळजनक आरोप केला आहे.

या आरोपानंतर ठाकरे सरकारला विरोधी पक्षाने चांगलच धारेवर धरलं आहे. भाजपने गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता ठाकरे सरकारविरोधात आयपीएस अधिकारी संजय पांडे आक्रमक झाले आहेत.

मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्याने त्यांच्या जागी राज्य सरकारने हेमंत नगराळे यांच्याकडे पदभार दिला आहे. तसेच राज्य पोलिस महासंचालक पदाचा कारभार रजनीश सेठ यांच्याकडे देण्यात आला आहे.

संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र सुरक्षा दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे संजय पांडे नाराज झाले होते. त्यानंतर ते रजेवर निघून गेले होते. पोलिस महासंचालक पदी नियुक्त न केल्याने संजय पांडे ठाकरे सरकारविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत.

त्यांच असं म्हणणं आहे की, उच्च न्यायालयाचा नियम आहे की, उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती दिली पाहिजे. मात्र राज्य सरकारने उच्च न्यायालयाचा नियम न पाळता कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याची पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती केली आहे.

दरम्यान परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यानंतर आता आयपीएस अधिकारी संजय पांडे ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार असल्याने पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
अरविंद सावंत यांनी संसदेच्या लॉबीमध्ये धमकवले; नवनीत राणा यांचा गंभीर आरोप
वाझे-देशमुख यांची भेट झाल्याचा दावा चुकीचा; अनिल देशमुख यांना शरद पवारांचा खंबीर पाठिंबा
पबवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसाला परमबीरसिंगांनी सस्पेंड केलं; अन् 2 कोटींची मागणी केली
“जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही जास्त मुलं जन्माला का नाही घालत?”

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.