“महाराष्ट्रात सरकार बनत असताना रश्मी शुक्लांनी नेत्यांचे फोन टॅप केले, त्या भाजपच्या एजंट”

मुंबई : राज्यात पोलिसांच्या बदल्यांसाठीचं रॅकेट तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी उघडकीस आणलं होतं. पण त्यावर मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी कोणतची कारवाई केली नाही, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं असून गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात सरकार तयार करत असताना रश्मी शुक्ला सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘फडणवीस हे खोटी माहिती देऊन महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. ते आज ज्या पद्धतीने रश्मी शुक्ला यांची बाजू घेत होते त्यावरुन फडणवीसांचा खोटेपणा उघड झाला आहे. पोलीस बदल्यांच्या रॅकेटवेळी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी घेऊन फोन टॅप करण्यात आले होते, असे फडणवीस सांगतात.

मात्र, गृहमंत्रालयाची अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला या अनेक लोकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करायच्या, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात जेव्हा सरकार बनत होतं त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप केले. त्या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या. बदल्यांच्या रॅकेट संदर्भात फडणवीसांच्या म्हणण्यानुसार शुक्ला यांनी परवानगी घेऊन फोन टॅप केले, असा आरोप देखील मलिक यांनी लगावला आहे.

मात्र शुक्ला यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार राज्यात पोलिसांच्या बदल्या झाल्याच नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप सपेशल खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे आणि हे सारं फडणवीसांना माहित असूनही ते फक्त सरकारची बदनामी करण्याचं काम करत आहेत”, असे मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

सनी देओलमूळे धर्मेंद्रने बोनी कपूरला दिली होती धमकी; वाचा पुर्ण किस्सा

का तुटलं अंकिता आणि सुशांतसिंगचं नातं? अखेर अंकिताने सांगितलं खरं कारण

‘पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कोणत्या आधारावर वर्ग केली?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.